vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत अथलेटिक्स निवडचाचणी १४ मे रोजी

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत अथलेटिक्स निवडचाचणी १४ मे रोजी

बुलढाणा, प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत राज्यातील क्रीडा विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी “मिशन लक्ष्यवेध” उपक्रमांतर्गत बुलढाणा जिल्ह्यात क्रीडा प्रतिभा विकास केंद्र कार्यान्वित करण्यात येत आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून जिल्ह्यातील गुणवंत खेाडूंना ऑलिम्पिक स्तरावरील कामगिरीसाठी तयार करण्यात येणार असून विविध खेळांच्या निवडचाचणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

या उपक्रमांतर्गत बुलढाणा जिल्ह्यात अथलेटिक्स, आर्चरी, बॅडमिंटन, बॉक्सिंग व वेटलिफ्टिंग या पाच खेळांसाठी प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. प्रत्येक खेळ प्रकारासाठी २० खेळाडूंची निवड करण्यात येणार असून त्यांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये गुणवत्ताधारक प्रशिक्षक, फिजिओथेरपिस्ट, न्यूट्रिशनिस्ट, पूरक आहार, क्रीडा साहित्य, गणवेश, वैद्यकीय चाचण्या तसेच देश-विदेशातील प्रशिक्षणासाठी सहकार्याचा समावेश आहे.

त्यानुसार अथलेटिक्स खेळाची निवडचाचणी दि. १४ मे २०२६ रोजी सकाळी ७ वाजता जिल्हा क्रीडा संकुल, बुलढाणा येथे आयोजित करण्यात आली आहे. अर्ज सादर केलेल्या तसेच निवडचाचणी देण्यास इच्छुक असलेल्या खेळाडूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती भक्ती आंग्रे यांनी केले आहे.

यापूर्वी निवडचाचणी दिलेल्या खेळाडूंनाही पुन्हा चाचणी देण्याची संधी उपलब्ध राहणार आहे. खेळाडूंनी अर्जासोबत आवश्यक मूळ कागदपत्रे तसेच तीन पासपोर्ट आकाराचे फोटो जोडून कार्यालयात सादर करावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

vishwatmaklokswamivarta

बीट प्लास्टिक पोल्यूशन’ या विषयावर संत निरंकारी मिशनचे-व्यापक वृक्षारोपण व स्वच्छता अभियान

     पंतप्रधान इंटर्नशिप योजना’, लाभ घेण्याचे आवाहन                                        

शिवसेना शिष्टमंडळाने घेतली नुतन पोलीस अधिक्षकांची भेट

बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ -उभाटा आणि मनसे यांचा | मुंबईकरांसाठी शिवशक्तीचा वचननामा जाहीर..

vishwatmaklokswamivarta

आपत्तीत मदत व बचाव कार्यासाठी-एनडीआरएफ, एसडीआरएफ पथके सतर्क