vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

बॉक्सिंग चॅम्पियन पद्मविभूषण मेरी कोम यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा उत्साहात संपन्न..

बॉक्सिंग चॅम्पियन पद्मविभूषण मेरी कोम यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा उत्साहात संपन्न..

       राज्य प्रतिनिधी-    कोणत्याही क्षेत्रात योग्य रितीने मेहनत केल्याशिवाय यश मिळत नाही हे लक्षात घ्या, त्याला बॉक्सिंगचे क्षेत्र सुध्दा अपवाद नाही असे सांगत जागतिक किर्तींच्या बॉक्सिंग चॅम्पियन पद्मविभूषण मेरी कोम यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी बॉक्सिंग खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. सातत्याने सराव, नवनवीन गोष्टी शिकण्याची इच्छा, जिद्द आणि चिकाटी हे अत्यंत महत्वाचे गुण असून एका यशाने समाधानी न होता व एका अपयशाने खचून न जाता सतत खेळत राहणे हाच यशाचा खरा मंत्र असल्याचे त्या म्हणाल्या.

 नवी मुंबईच्या महापौर श्रीम.सुजाता पाटील आणि ऑलिम्पिक पदक विजेत्या सुप्रसिद्ध भारतीय बॉक्सर श्रीम.मेरी कोम यांच्या प्रमुख उपस्थितीत मरिन बॉक्सींग ॲकेडमी या नामांकित क्रीडा संस्थेच्या वतीने, नवी मुंबई महानगरपालिकेच्या सहयोगाने, नेरूळ सेक्टर 40 येथील नेक्सस सी वूड मॉल मध्ये ‘आयबीए ग्लोबल बॉक्सिंग सिरीज (IBA Global Boxing Series)’ या आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्रीडा, सांस्कृतिक व युवक कल्याण समितीचे सभापती श्री.गिरीश म्हात्रे, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती उपआयुक्त श्रीम.अभिलाषा पाटील, क्रीडा अधिकारी श्री.रेवप्पा गुरव, क्रीडापटू श्री.हितेश चौधरी व मरिन बॉक्सिंग अकॅडमीचे प्रमुख श्री.देवराज दास आदी मान्यवर उपस्थित होते.

 नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध खेळांना चांगले व्यासपीठ उपलब्ध करून देऊन खेळांडूमध्ये प्रेरणा निर्माण करण्याचे काम केले जात असल्याचे सांगत महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी श्रीम. मेरी कोम यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित बॉक्सिंग चॅम्पियन या स्पर्धेच्या निमित्ताने नवी मुंबईत आल्याने या स्पर्धेची उंची वाढल्याचे सांगितले. यापुढील काळात सर्वच खेळांसाठी पायभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबध्द राहून प्रयत्न करण्यात येतील असे त्या म्हणाल्या. याप्रसंगी क्रीडा रसिक व विशेषत्वाने युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0000

 

संबंधित पोस्ट

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या उपस्थितीत वटपौर्णिमेनिमित्त वृक्षारोपण

सैलानी यात्रा महोत्सवाचे नियोजन करावे-   पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पूर्व तयारीचा आढावा८ ते २३ मार्च दरम्यान यात्रा महोत्सव ४-५ लाख भाविक येण्याची शक्यता

vishwatmaklokswamivarta

बँकांनी ग्राहकांच्या तक्रारीची गंभीरतेने दखल घ्यावी अन्यथा रिझर्व बँक कारवाईचा बडगा उगारणार, जनजागृती कार्यक्रम आणि बँकिंग तक्रार निवारण कार्यशाळेचे आयोजन

टंचाई सदृश्य गावांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी आराखडा- मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील

सांगलीत शुक्रवारपासून तीनदिवसीय फळ महोत्सव

vishwatmaklokswamivarta

सुधागड पंचायत समितीला आय.एस.ओ. मानांकन