vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नांदेड तालुका महसूल प्रशासनाचा “शोध वंचित लाभार्थ्यांचा” विशेष उपक्रम30 एप्रिल रोजी वाजेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

नांदेड तालुका महसूल प्रशासनाचा “शोध वंचित लाभार्थ्यांचा” विशेष उपक्रम30 एप्रिल रोजी वाजेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

नांदेड द प्रतिनिधी : नांदेड तालुक्यात महसूल विभागाने महाराजस्व समाधान शिबिराच्या माध्यमातून “शोध वंचित लाभार्थ्यांचा” या नावीन्यपूर्ण विशेष उपक्रमांतर्गत शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र असूनही वंचित असणाऱ्या लाभार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना लाभ देण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. यामुळे शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थी संख्येत वाढ होणार आहे. नांदेड तालुक्यातील हा नावीन्यपूर्ण उपक्रम राज्यात लक्षवेधी ठरू शकतो.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनात व उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसीलदार संजय वारकड यांच्या सूक्ष्म नियोजनात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर नांदेड तालुक्यातील वाजेगाव महसूल मंडळातील वाजेगाव येथे राष्ट्रमाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात येत्या 30 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता घेण्यात येणार आहे. सदर शिबिराचे उद्घाटन नांदेड दक्षिण विधानसभेचे आमदार आनंदराव पाटील तिडके बोंढारकर यांच्या हस्ते होणार आहे. या शिबिरात महसूल विभागाबरोबरच शासनाच्या विविध विभागाकडून लाभार्थ्यांना लाभ दिला जाणार आहे.

सदर शिबिराच्या माध्यमातून “शोध वंचित लाभार्थ्यांचा” या नावीन्यपूर्ण विशेष उपक्रम राबविला जात आहे. शासनाच्या विविध योजनेची माहिती गाव पातळीवर देऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र असूनही वंचित असणाऱ्या विशेष सहाय्य योजनेअंतर्गत निराधार विधवा, दिव्यांग , वयोवृद्ध, दुर्धर आजार ग्रस्त, अत्याचारित महिला, परितक्त्या, अनाथ मुले, एकल महिला, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब, घटस्फोटीत महिला आदी लाभार्थ्यांचा शोध घेऊन त्यांचे अर्ज भरून घेऊन लाभ देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. या उपक्रमात नायब तहसीलदार महसूल सुनील माचेवाड, स्वप्नील दिगलवार तसेच महसूल विभागाचे क्षेत्रीय कर्मचारी, एकात्मिक बाल विकास प्रकल्प विभागाचे अधिकारी, अंगणवाडी कर्मचारी तसेच अनुलोम, विहान या सामाजिक संस्था प्रयत्नशील असून विशेष कॅम्प आयोजित करून योजनेसाठी आवश्यक कागदपत्रासह अर्ज भरण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. राज्यात महाराजस्व समाधान शिबिर सध्या चालू असून नांदेड मधील या उपक्रमामुळे शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थी संख्येत लक्षणीय वाढ होणार असल्याने सदर उपक्रम लक्षवेधी ठरणार आहे.

00000

संबंधित पोस्ट

एनएमएमटी घणसोली आगारात महापौर श्रीम.सुजाता पाटील यांच्या हस्ते व्यायामशाळेचे उद्घाटन

एसटी कर्मचाऱ्यांच्या आरोग्य चाचण्या विशिष्ट ठिकाणी करण्याची सक्ती नाही- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

भारतीय बौद्ध महासभेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा; मोती तलावातील मूर्ती बसविण्यासह विविध मागण्यांचे निवेदन

vishwatmaklokswamivarta

*उपहारगृह सुरू करण्यासाठी निवीदा सादर करण्यास मुदतवाढ*

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांची कागदपत्रे पडताळणी करण्याचे आवाहन

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते दाखले वितरण