
जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना नोकरीची सुवर्ण संधी बेरोजगार उमेदवारांनी जागेवर निवड संधीचा लाभ घ्यावा
रायगड-अलिबाग, प्रतिनिधी:- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,रायगड-अलिबाग कार्यालयातर्फे दि.30 जून 2026 रोजी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,रायगड-अलिबाग वैभव निवास, भंडार आळी,चेंढरे, अलिबाग येथे जागेवर निवड संधी /Placement Drive आयोजित करण्यात आले असून जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी या जागेवर निवड संधी /Placement Drive चा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मागदर्शन केंद्र, रायगड-अलिबागचे प्र.सहायक आयुक्त श्रीकांत कोकाटे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील नामांकीत आस्थापनांकडील विविध रिक्तपदांच्या/ॲप्रेंटिसशिपची भरतीसाठी जागेवर निवड संधी /Placement Drive आयोजित केला आहे. या जागेवर निवड संधी /Placement Drive मध्ये नोकरी इच्छूक उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. या विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या उमेदवारांना ऑनलाईन पध्दीतीने अर्ज करता येईल. प्रथम https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेत स्थळावरील Employment- Job Seeker (Find A Job)- Job Seeker Login या क्रमाने जाऊन आपल्या कडील युजर आयडी व पासवर्ड वापरुन आपली शैक्षणिक माहीती अद्ययावत करून त्यातील Pandit Dindayal Upadhyay Job Fair या ऑप्शनमधून आपला जिल्हा निवडून जिल्ह्याच्या नावावरील Vacancy Listing-I Agree व दिसणाऱ्या विविध पदांना आपल्या शैक्षणिक अर्हते प्रमाणे ऑनलाईन अप्लाय करावे
जागेवर निवड संधी/Placement Drive मध्ये सहभागी होणाऱ्या नवउद्योजकांकरिता महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या कर्ज योजनां विषयाची माहिती दिली जाईल. तसेच जिल्ह्यातील कार्यरत महामंडळ जागेवर निवड संधी /Placement Drive मध्ये आपल्या विविध कर्ज योजनासह सहभागी होत आहेत. आपल्याला कर्ज योजनेबद्दल माहिती व मार्गदर्शन याद्वारे दिले जाईल. जेणे करून स्वयंरोजगार करणाऱ्या इच्छूक उमेदवारांना योजनेचा लाभ मिळू शकेल. जिल्ह्यात राबविले जाणारे मोफत कौशल्य प्रशिक्षणाची माहिती व जागेवर निवड संधी/ Placement Drive मध्ये केले जाणार आहे. तसेच जागेवर निवड संधी /Placement Drive मधील रिक्तपदांची माहिती https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. संकेतस्थळावर ऑनलाईन अप्लाय करताना काही समस्या असल्यास या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 02141-222029 व या कार्यालयाचे लिपिक टंकलेखक श्री.म.भा.वखरे,यांच्या 9421613757 या भ्रमध्वनी वर संपर्क साधावा.
०००००००



