vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

जिल्ह्यात स्टॉप डायरिया अभियान राबविणार

जिल्ह्यात स्टॉप डायरिया अभियान राबविणार

 

रायगड-अलिबाग, आरोग्य प्रतिनिधी:- शुध्द, स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे जलजीवन मिशनअंतर्गत पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमाचा उद्देश आहे. जलजन्य आजार रोखण्याबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी जिल्ह्यात 16 जून ते 31 जुलै 2026 या कालावधीत स्टॉप डायरिया अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती पाणी व स्वच्छता विभागाच्या प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता शुभांगी नाखले यांनी दिली आहेया अभियानामध्ये गावातील अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्र ,सरकारी कार्यालये व प्राथमिक शाळा येथील पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यात येणार आहे. पावसाळ्यामध्ये दूषित पाणी पिऊन डायरिया,गॅस्ट्रो व कावीळ यासारखे अनेक आजार होत असतात त्यामुळे पिण्याचे पाणी निर्जंतुकीकरण करून पिण्यासाठी वापरल्यास या आजारांना दूर ठेवता येणार आहे. यासाठी गाव स्तरावर विविध उपक्रम घेऊन लोकांच्या मध्ये जनजागृती करण्यात येणार आहे . एकूण सहा आठवडे हे अभियान चालणार असून प्रत्येक आठवड्यात वेगवेगळ्या वेगवेगळे उपक्रम गाव पातळीवर घेण्यात येणार आहेत. पाणी शुद्ध करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात येणार आहे व शुद्ध पाण्याचे महत्व सांगणेत येणार आहे. या अभियानामध्ये मुख्यतः पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन व त्याची योग्य हाताळणी, स्वच्छता जागृती कार्यक्रम, पाणी गळतीच्या जागा शोधून त्याची दुरुस्ती करणे, पाणी तपासणी बाबत गाव पातळीवर पोस्टर बॅनर्स लावण्यात येणार आहेत. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावातील शाळा, अंगणवाड्या प्राथमिक आरोग्यकेंद्रे येथे स्वच्छता जागृती कार्यक्रम घेण्यात येणार आहे. ग्रामस्थांमध्ये कचऱ्याच्या वर्गीकरणाच्या बाबतीत जागृती निर्माण करणे यासाठी घरोघरी भेटी देऊन, कचऱ्याचे वर्गीकरण करण्यास प्रोत्साहन देणे याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच गावामध्ये घनकचरा नियम 2026 नुसार कचऱ्याचे योग्य वर्गीकरण व हाताळणी याबाबत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

पाणीपुरवठा योजनेतील पाणी गळती शोधून त्याची दुरुस्ती करणे, पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करणे, घरगुती स्तरावरील पाणी साठवणुकीच्या टाक्यांची स्वच्छता करणे, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी नादुरुस्त शौचालयांची दुरुस्ती करणे, पिण्याच्या पाण्याचे स्रोतांची स्वच्छता ठेवणे, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता याबाबत गावांना सक्षम करण्यासाठी गावातील सर्व घटकांचा या अभियानामध्ये सहभाग घेण्यात येणार आहे. छतावरील पाऊस पाणी संकलन करून पावसाचे पाणी साठवण्याच्या तंत्राबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी, शिक्षक, अंगणवाडी सेविका यांना सुरक्षित पाणी वापराच्या महत्त्व याबाबत रॅली, पोस्टर ,पथनाट्ये तसेच घरोघरी जाऊन पत्रकांचे वाटप यांच्यामार्फत जनजागृती करण्यात येणार. पाणी गुणवत्ता विषयक माहितीबाबत जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करून घराघरात पिण्याचे शुदध व मुबलक पाणी उपलब्ध होईल यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावाने या अभियानात सहभाग घेऊन अभियान यशस्वीपणे राबविण्यात यावे असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेच्या जिल्हा पाणी व स्वच्छता विभागामार्फत करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

जिल्हा सामान्य रुग्णालयात दिव्यांग तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

आयुष्मान आरोग्य मंदिर आणि राष्ट्रीय आरोग्य मोहिमेअंतर्गत 10.18 कोटी महिलांची गर्भाशयाच्या कर्करोगाची तपासणी

जिल्हा रुग्णालयात #हृदयरोग निदान व #आरोग्यशिबीर संपन्न शिबिरात 181 बालकांची तपासणी तर 75 पात्र बालकांवर किम्स हॉस्पिटल ठाणे येथे लवकरच मोफत हृदय शस्त्रक्रिया                                                                                  

vishwatmaklokswamivarta

स्वातंत्र्यदिनी बुलढाण्यात ‘ऑपरेशन सिंदुर सन्मान’ महारक्तदान शिबिर

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम — दि. १२ ऑक्टोबर २०२५“दोन थेंब आयुष्याचे – प्रत्येक बालकासाठी सुरक्षित भविष्याचे”..

चिमुकलीचा जीव वाचविला नाही तर जग माफ करणार नाही’- डॉ. सुधा कांकरिया लिंगगुणोत्तर कमी असलेल्या १६ गावांसाठी विशेष कार्यशाळा संपन्न.