vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नगरपरिषद, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करतनिःपक्ष, पारदर्शक पद्धतीने निवडणूक पार पाडा- जिल्हाधिकारी अशोक काकडे- यंत्रणांच्या आढावा बैठकीत दिल्या सूचना

नगरपरिषद, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करतनिःपक्ष, पारदर्शक पद्धतीने निवडणूक पार पाडा- जिल्हाधिकारी अशोक काकडे- यंत्रणांच्या आढावा बैठकीत दिल्या सूचना

सांगली, द प्रतिनिधी) : सांगली जिल्ह्यातील 6 नगरपरिषदा व 2 नगरपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यापासून त्या क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहिता कालावधीत आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन होईल, याची संबंधित यंत्रणांनी योग्य ती दक्षता घ्यावी. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. ही निवडणूक निःपक्ष, पारदर्शक पद्धतीने पार पाडावी, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक काकडे यांनी आज दिल्या.

सांगली जिल्ह्यात आष्टा, उरुण – ईश्वरपूर, जत, पलूस, तासगाव व विटा नगरपरिषद या 6 नगरपरिषदा व आटपाडी व शिराळा या दोन नगरपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता, कायदा व सुव्यवस्था आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे व दूरदृष्य प्रणालीद्वारे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी जिल्ह्यातील संबंधित 6 नगरपरिषदा व 2 नगरपंचायतींचे निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी असलेल्या उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांना आदर्श आचारसंहिता व कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात आयोजित या बैठकीस अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय अधिकारी विक्रम बांदल, रणजीत भोसले, उत्तम दिघे, अजयकुमार नष्टे, श्रीनिवास अर्जुन, सहआयुक्त, नगर प्रशासन दत्तात्रय लांघी, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार आणि सुशांत पाटील यांच्यासह दूरदृष्यप्रणालीद्वारे सर्व तहसीलदार, निवडणूक होत असलेल्या नगरपरिषद, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांच्यासह पोलीस, राज्य उत्पादन शुल्क, जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी उपस्थित होते.

आदर्श आचारसंहितेतील 24, 48 आणि 72 तासांतील कार्यवाही पूर्ण झाल्याची खात्री करण्याचे सूचित करून जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, नगरपरिषद, नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने संबंधित तहसीलदार, पोलीस निरीक्षक आणि मुख्याधिकारी यांनी परस्पर समन्वय ठेवावा. आवश्यकतेनुसार क्षेत्रीय भेटी व मतदान केंद्रांना भेटी द्याव्यात. प्रत्येक प्रभागासाठी चोख नियोजन करून आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध ठेवावे. नियुक्त कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांची जबाबदारी समजून सांगावी. निवडणूक प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शांततेत, निःपक्ष, पारदर्शी वातावरणात पार पडेल, यासाठी आवश्यक ती सर्व दक्षता संबंधित सर्व यंत्रणांनी घ्यावी, असे त्यांनी यावेळी सूचित केले.

जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, मतदान केंद्रांवरही योग्य व किमान आवश्यक सुविधांबाबत तयारी करावी. दिव्यांग, गर्भवती महिला व जेष्ठ नागरिकांची गैरसोय होणार नाही, यासाठी पुरेशी काळजी घ्यावी. निवडणूक आयोगाने दिलेल्या निवडणूक अधिकारी मार्गदर्शक सूचनांचा व्यवस्थित अभ्यास करून नियमांचे तंतोतंत पालन करावे. निवडणूक प्रक्रियेसंदर्भातील सर्व नियम, कालावधी व वेळा यांचे पालन करावे, असे त्यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट

राज्यात नागरी भागात तुकडेबंदी कायदा रद्द महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेची विधानसभेत घोषणाआदर्श कार्यप्रणाली तयार करण्यात येणार· ५० लाख कुटुंबांना लाभ

राज्य परिवहन महामंडळ बुलढाणा विभागाचा उपक्रम-विविध पॅकेज टुर्सचे आयोजन:प्रवाशांनी लाभ घ्यावा..

आरोग्य सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोचविण्यासाठी केंद्र व राज्य शासन कटिबद्ध*- प्रतापराव जाधव*राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त सिंदखेडराजा व सवणा येथील मोफत आरोग्य रोगनिदान शिबिराचा गरजूंनी घेतला लाभ !*

vishwatmaklokswamivarta

खडकपूर्णा धरणातून अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्या १५ बोटी जिलेटिनद्वारे उध्वस्त,सिंदखेडराजा, बुलढाणा आणि जालन्यातील पथकाची संयुक्त कारवाई

vishwatmaklokswamivarta

महसूलविषयक सुधारित कार्यपद्धतींची अंमलबजावणी १५ ऑगस्टपासून- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महसूल क्षेत्रीय अधिकारी कार्यशाळेत मुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शन

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुरस्कार स्पर्धेसाठी 26 ऑगस्टपूर्वी अर्जाचे आवाहन