vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यातील पर्यटनाला मिळणार ‘होमस्टे’ची जोड; स्थानिकांना रोजगाराची संधी

जिल्ह्यातील पर्यटनाला मिळणार ‘होमस्टे’ची जोड; स्थानिकांना रोजगाराची संधी

   राज्य प्रतिनिधी-  अमरावती,  महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयाच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील पर्यटनाला नवी चालना देण्यासाठी ‘होमस्टे’ योजना आता अधिक प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या योजनेमुळे पर्यटकांना जिल्ह्याची संस्कृती जवळून अनुभवता येईल, तर स्थानिक नागरिकांना आपल्या घराच्या माध्यमातून उत्पन्नाचे साधन मिळेल, अशी माहिती पर्यटन संचालनालयाचे विभागीय उपसंचालक विजय जाधव यांनी दिली आहे.

    या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे स्थानिक नागरिक त्यांच्या घरातील उपलब्ध खोल्या पर्यटकांच्या निवासासाठी अधिकृतपणे देऊ शकतील. यामुळे पर्यटकांना हॉटेलऐवजी स्थानिक परंपरा, खाद्यसंस्कृती आणि ग्रामीण जीवनशैलीचा अस्सल अनुभव घेता येईल. या उपक्रमाचा मोठा लाभ विशेषतः ग्रामीण आणि आदिवासी भागातील जनतेला होणार असून, त्यातून शाश्वत पर्यटन आणि स्थानिक रोजगार निर्मितीला बळ मिळणार आहे.

    जिल्ह्यातील इच्छुक घरमालकांनी शासनाने निर्धारित केलेले निकष पूर्ण करून आपली नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीकृत होमस्टेंना पर्यटन विभागामार्फत तांत्रिक मार्गदर्शन, प्रसिद्धी आणि विविध शासकीय योजनांचे लाभ प्राधान्याने दिले जातील. अमरावती विभागातील हॉटेल व्यावसायिक आणि नागरिकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन स्वयंपूर्ण व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.      या योजनेच्या अधिक माहितीसाठी किंवा नोंदणी प्रक्रियेसाठी इच्छुकांनी कमलेश नंदनवार (मो. क्र. ८९७५८४८९८७) किंवा श्रीमती उज्ज्वला काळे (मो. क्र. ८३७९०५८०६०) यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

000000

संबंधित पोस्ट

जागतिक कावीळ दिन जनजागृती रॅली संपन्न कावीळ संसर्ग कमी करण्यासाठी समाजाचा सहभाग महत्वाचा- जिल्हा शल्यचिकित्सक डॉ युवराज करपे

धारावी वॉर्ड १८५ मध्ये तिकीट नाकारल्याबद्दल भाजप कार्यकर्त्यांनी दादर कार्यालयात गोंधळ घातला

vishwatmaklokswamivarta

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांचा राज्य स्तरावर गौरव ‘सेतू सुविधा’ केंद्रांच्या माध्यमातून सुलभ प्रशासनासाठी सन्मान; ‘सेवा हक्क दिनी’ मुख्य सचिवांच्या हस्ते गौरव

विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पद्म पुरस्कार-2027 साठी नावे सादर करावीत

मुंबईतील कांजूरमार्ग कचरा डेपोसंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली बैठक. 

सौरऊर्जेच्या माध्यमातून दिवसा वीज उपलब्ध करुन देण्याचा शासनाचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुढाळे येथील महापारेषणच्या २२०/३३ के.व्ही. उपकेंद्राचे भूमिपूजन