vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हा परिषद अनुकंपा उमेदवारांचीतात्पुरती सुधारित प्रतिक्षायादी प्रसिध्दआक्षेप, हरकतींसाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदत

 जिल्हा परिषद अनुकंपा उमेदवारांचीतात्पुरती सुधारित प्रतिक्षायादी प्रसिध्दआक्षेप, हरकतींसाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदत

बुलढाणा प्रतिनिधी) : जिल्हा परिषद बुलढाणा अंतर्गत सन 2025 च्या अनुकंपाधारक उमेदवारांची तात्पुरती सुधारित प्रतिक्षायादी जिल्हा परिषदेच्या www.zpbuldana.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. या अनुकंपाधारक उमेदवारांच्या तात्पुरत्या ज्येष्ठता यादीवर संबंधिताकडून दिनांक 15 सप्टेंबर 2025 पर्यंत लेखी आक्षेप मागविण्यात आले आहे. तसेच या तात्पुरत्या यादीवर काही आक्षेप किंवा हरकती असल्यास विहीत मुदतीत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बुलढाणा या कार्यालयास लेखी सादर करावे. आक्षेपाची पडताळणी झाल्यानंतर अनुकंपा उमेदवारांची तात्पुरती प्रतिक्षायादी अंतिम करण्यात येईल, असे मुख्य कायकारी अधिकारी गुलाब खरात यांनी कळविले आ: अकोला जिल्ह्यातील घोंगा, कानडी लघुपाटबंधारे योजनांची दुरुस्ती होणारघोंगासाठी ४ कोटी ७६ लाख, तर कानडीसाठी ४ कोटी ९२ लाख रुपयांची तरतूद.   अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील घोंगा व कानडी लघुपाटबंधारे योजनेच्या दुरुस्तीसाठीच्या खर्चाच्या तरतुदीस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते  घोंगा लघुपाटबंधारे योजनेचे काम १९८६ मध्ये पूर्ण करण्यात आलेले आहे. तर कानडी कानडी लघुपाटबंधारे योजनेचे काम १९७७ मध्ये पूर्ण करण्यात आलेले आहे. या दोन्ही प्रकल्पाच्या पिचिंग ना-दुरुस्त झाले आहे, कालव्यामध्ये झाडेझुडपे वाढली आहेत, प्रकल्पावरील सेवारस्ता नादुरुस्त झाला आहे. त्यासाठी या दोन्ही प्रकल्पांच्या दुरुस्तीसाठी विशेष बाब म्हणून खर्चास मान्यता देण्यात आली. त्यानुसार घोंगा प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठीच्या ४ कोटी ७६ लाख ५५ हजार ३०० रुपयांच्या तरतुदीस मंजुरी देण्यात आली. या दुरुस्तीमुळे ३५ स.घ.मी. पाणीसाठा आणि ४५ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. या प्रकल्पाचा मूळ पाणी साठा १५५० स.घ.मी. आणि मूळ सिंचन क्षमता ३५० हेक्टर आहे.

तर कानडी प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठीच्या ४ कोटी ९२ लाख ३२ हजार ९८६ रुपयांच्या तरतुदीस मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पाच्या दुरुस्तीमुळे ३८ स.घ.मी. पाणी साठा आणि ४६ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. या प्रकल्पाचा मूळ पाणी साठा १७०० स.घ.मी. आणि मूळ सिंचन क्षमता २८६ हेक्टर

–०

संबंधित पोस्ट

नव्या जीएसटी सुधारणांतून भारताच्या आर्थिक विकासाला नवी गती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘मेरा देश पहले- द अनटोल्ड स्टोरी ऑफ श्री. नरेंद्र मोदी’ कार्यक्रमात मोदीजींच्या जीवनाचे प्रेरणादायी पैलूंचे दर्शन

vishwatmaklokswamivarta

आधुनिक तंत्रज्ञानामुळे भात शेती अधिक किफायतशीर व उत्पादनक्षम होणारतुळशी येथे खरीपपूर्व भात लागवड प्रशिक्षण व प्रात्यक्षिकाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांतील प्रलंबित नियुक्ती प्रस्तावांना महिनाभरात मंजुरी – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

15 व्या वित्त आयोगातून 26 ग्रामपंचायतींना ई-रिक्षा घनकचरा व्यवस्थापनाला मिळणार नवी गती, पालकमंत्र्यांच्या हस्ते हिरवी झेंडी..

एल्डर लाईन” 14567– ज्येष्ठांसाठी मदतीचा आधार

vishwatmaklokswamivarta

गोवंश संरक्षणासाठी मार्गदर्शक सूचना जाहिर; अवैध वाहतूक, कत्तल व अनधिकृत कत्तलखान्यांवर कठोर कारवाईचे निर्देश