vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नव्या जीएसटी सुधारणांतून भारताच्या आर्थिक विकासाला नवी गती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘मेरा देश पहले- द अनटोल्ड स्टोरी ऑफ श्री. नरेंद्र मोदी’ कार्यक्रमात मोदीजींच्या जीवनाचे प्रेरणादायी पैलूंचे दर्शन

नव्या जीएसटी सुधारणांतून भारताच्या आर्थिक विकासाला नवी गती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस’मेरा देश पहले- द अनटोल्ड स्टोरी ऑफ श्री. नरेंद्र मोदी’ कार्यक्रमात मोदीजींच्या जीवनाचे प्रेरणादायी पैलूंचे दर्शन.

राज्य प्रतिनिधी देशात आज, दि. 22 सप्टेंबर पासून दुसऱ्या टप्प्याच्या वस्तू व सेवा कर सुधारणा लागू होत असून, या सुधारणा भारताच्या आर्थिक विकासाला नवी गती देणाऱ्या आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

प्रसिद्ध गीतकार, शायर मनोज मुंतशीर यांची संकल्पना असलेल्या ‘मेरा देश पहले- द अनटोल्ड स्टोरी ऑफ श्री. नरेंद्र मोदी’ या संगीतमय कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.वांद्रे-कुर्ला संकुलातील नीता अंबानी सांस्कृतिक केंद्रात झालेल्या या कार्यक्रमास विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, माजी मंत्री विनोद तावडे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, देशाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या रूपाने एक असा नेता लाभला आहे, ज्यांनी नवभारताची निर्मिती केली. आज भारत जागतिक स्तरावर सन्मानाने उभा आहे, आणि त्याचे संपूर्ण श्रेय प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या दूरदृष्टीला जाते.मागील 11 वर्षांमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी भारताच्या अर्थव्यवस्थेला, विकासाला नवीन दिशा दिली आहे. गरिबी हटवण्यासाठी निर्णायक लढा दिला आहे. आता भारत जगात सर्व मंचावर पूर्ण सन्मानाने व ताकदीने उभा आहे, असे त्यांनी सांगितले.

श्री. फडणवीस म्हणाले की, 22 सप्टेंबर पासून सुरु होणाऱ्या सेकंड जनरेशन जीएसटी सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला नवी गती तर मिळणार आहे. शिवाय सर्व सामान्यांना फायदा होईलच, त्याबरोबरच आपला देश आत्मनिर्भर भारताच्या दिशेने अग्रेसर होईल.प्रधानमंत्री मोदीजींच्या व्यक्तिमत्त्वाच्या ‘अनटोल्ड स्टोरी’ विषयी मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, एक नवा भारत, एक शक्तिशाली भारत, एक लीडर भारत, मोदीजींनी तयार केला आहे, तो करत असताना मोदीजींच्या जीवनाचे अनेक पैलू हे आपल्यासमोर आले आहेत. परंतू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे व्यक्तिमत्व कसे तयार झाले? कोणत्या कठीण परिस्थितीतून ते गेले? देशासाठी समर्पित असलेलं त्यांचे जीवन टप्प्याटप्प्याने कसे घडले, हे अप्रकाशित पैलू या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे. या सर्व गोष्टी प्रेरणादायी आहेत, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.

प्रसिद्ध गीतकार, शायर मनोज मुंतशीर यांन ‘मेरा देश पहले- द अनटोल्ड स्टोरी ऑफ श्री. नरेंद्र मोदी’ या संगीतमय कार्यक्रमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या बालपणापासून त्यांच्या राजकीय प्रवासापर्यंत, आव्हानात्मक काळ, नेतृत्त्वाची भूमिका, तसेच आयुष्याच्या अशा पैलूंचे सादरीकरण केले.

 

00000

संबंधित पोस्ट

भारतीय हवाई दल आजपासून फ्रान्समध्ये होणाऱ्या गरुड २५ या द्विपक्षीय हवाई सरावाच्या ८ व्या आवृत्तीत सहभाग

vishwatmaklokswamivarta

एल्डर लाईन” 14567– ज्येष्ठांसाठी मदतीचा आधार

vishwatmaklokswamivarta

मतदान शांततेत पार पडावे म्हणून जिल्ह्यात मनाई आदेश-7 फेब्रुवारीला मतदान, 9 फेब्रुवारीला मतमोजणी…

vishwatmaklokswamivarta

आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम; इच्छुकांना अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

अचूक जनगणनेसाठी सजग राहून काम करा-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे,· तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांचे तीन दिवसीय प्रशिक्षण सत्र सुरू

जालना हे विचारांचे शहर, जालन्याच्या विकासासाठी भाजपलाच संधी द्या – रावसाहेब पाटील दानवे-भाजपचाच महापौर होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ – माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर भाजपला बहुमत दिल्यास जालन्याचा चेहरामोहरा बदलेल – कैलास गोरंट्याल एकजुटीने भाजपच्या पाठीशी उभे रहा – भास्कर आबा दानवे

vishwatmaklokswamivarta