vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आदी कर्मयोगी अभियानांतर्गत शेणे येथे मेळावा संपन्न*

*आदी कर्मयोगी अभियानांतर्गत शेणे येथे मेळावा संपन्न*

*रायगड-अलिबाग, प्रतिनिधी* आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावून त्यांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनविण्यासाठी केंद्र सरकारने “धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष” अभियानांतर्गत “आदी कर्मयोगी” उत्तरदायी शासन हा राष्ट्रीय पातळीवरील कार्यक्रम सुरू केला आहे. रायगड जिल्ह्यातील 14 तालुक्यांमधील 113 गावांमध्ये हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबविला जाणार आहे. यामुळे जिल्ह्यात आदी कर्मयोगी उत्तरदायी शासन कार्यक्रमाला सुरुवात झाली असून  पेण तालुक्यातील शेणे आदिवासी वाडी येथे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

   यावेळी पेण विधानसभा आमदार रविंद्र पाटील, उपविभागीय अधिकारी पेण, प्रवीण पवार, तहसिलदार तानाजी शेजाळ, गट विकास अधिकारी श्री.लेंडी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे, नायब तहसिलदार श्री.कालेकर, सरपंच, उपसरपंच यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी तसेच आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     यावेळी जिल्हाधिकारी श्री.जावळे म्हणाले की, आदि कर्मयोगी अभियानांतर्गत आपल्याला गावाचा विकास आराखडा तयार करायचा आहे. त्या आराखड्याला 2 ऑक्टोबर रोजी आपल्या ग्रामसभेत ठेवून मान्यता घेऊन ती सर्व कामे भविष्यात आपल्याला करायची आहेत. आदिवासी बांधवांसाठी दळी जमिनीचे प्लॉट किमान निश्चिती करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या.

    जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत जिवंत सातबारा, उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र दाखल्यांचे वाटप आपण वर्षभर राबवित आहोत. महसूल विभागाचे राजस्व अभियान व ग्रामविकास विभागाचे मुख्यमंत्री पंचायतराज अभियान यांचा उद्देश तळागाळातील आदिवासी बांधवांना सशक्त करणे व गावांचा सर्वांगीण विकास साधणे त्याचप्रमाणे शासनाच्या सर्व योजनांचा लाभ पोहोचविणे हा आहे, असेही ते यावेळी म्हणाले.   यावेळी आमदार रविंद्र पाटील आणि उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.   या कार्यक्रमादरम्यान जिल्हाधिकारी श्री.जावळे यांच्या हस्ते धरती आबा योजनेंतर्गत दाखल्यांचे वाटप करण्यात आले.    कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे यांनी केले.

०००००००

संबंधित पोस्ट

बाल शक्ती पुरस्कार; ऑनलाईन अर्ज आमंत्रित

जिल्हा न्यायालय रायगड, अलिबाग येथे ई-सेवा व नक्कल कॉपी केंद्राचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

श्रीरामकृष्ण सेवाट्रस्ट कल्याण तर्फे गरजूना अन्न धान्य वाटप 

vishwatmaklokswamivarta

दैनिक हिंदमाता मिररच्या संपादकावर हल्ला : आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी.

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून नमुंमपा मुख्यालयात सामुहिक मतदान शपथ ग्रहण

vishwatmaklokswamivarta

एसटी महामंडळाच्या सर्व बसेस टप्प्याटप्प्यानेअपारंपरीक इंधनावर परावर्तीत करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस