vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यप्रदेश

३६५ निक्षय गीत मैफिलींचा यशस्वी टप्पा सांगीतिक उपक्रमातून क्षयरुग्णांना पोषणाची साथ

३६५ निक्षय गीत मैफिलींचा यशस्वी टप्पा सांगीतिक उपक्रमातून क्षयरुग्णांना पोषणाची साथ

 

कोल्हापूर, प्रतिनिधी : प्रधानमंत्री क्षयमुक्त भारत अभियानांतर्गत (निक्षय मित्र) क्षयरुग्णांना पोषण आहार उपलब्ध करून देण्यासाठी कोल्हापुरात राबविण्यात आलेल्या ‘निक्षय गीत मैफिल’ या नाविन्यपूर्ण सांगीतिक उपक्रमाने एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड गाठला आहे. ‘३६५ दिवस, ३६५ निक्षय गीत मैफिली’ हे उद्दिष्ट यशस्वीपणे पूर्ण करत या उपक्रमांतर्गत ३६५ मैफिलींचे आयोजन करण्यात आले.जिल्हा क्षयरोग केंद्राच्या सहकार्याने जाणीव फाउंडेशन, श्रीमती यमुनाताई पाटील चॅरिटेबल ट्रस्ट आणि प्रतिज्ञा नाट्यरंग संस्था (स्नेहसंगीत प्रतिज्ञा) यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे आणि जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक यांचे विशेष सहकार्य लाभले.
जागतिक संगीत दिनानिमित्त २१ जून २०२५ रोजी सुरू झालेला हा उपक्रम २० जून २०२६ रोजी यशस्वीरीत्या पूर्ण झाला. साने गुरुजी वसाहत येथील विकास प्रतिज्ञा स्टुडिओमध्ये प्रतिज्ञा नाट्यरंग संस्था – स्नेहसंगीत प्रतिज्ञाचे राजेंद्र चौगुले, अभिजीत पाटील, अमरसिंग राजपूत, नीलांबरी जाधव, अनिल मोरे, कृष्णात जमदाडे आणि प्रशांत जोशी आदी कलाकारांनी फेसबुक लाईव्ह तसेच प्रत्यक्ष सादरीकरणाच्या माध्यमातून या मैफिली सादर केल्या.
या उपक्रमातून जमा झालेल्या निधीतून जाणीव फाउंडेशनमार्फत ७९ क्षयरुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना पोषण आहार किटचे वितरण करण्यात आले. यासाठी स्नेहसंगीत प्रतिज्ञाचे प्रशांत जोशी आणि जाणीव फाउंडेशनच्या सौ. सुषमा बटकंडली यांचे विशेष योगदान लाभले.
उपक्रमाच्या यशस्वी पूर्ततेनिमित्त स्नेहसंगीत प्रतिज्ञाचे प्रशांत जोशी तसेच सर्व गायकवृंदाचा सत्कार जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. हर्षला वेदक आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. तेजल जाधव यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला. तसेच उपक्रमासाठी योगदान देणाऱ्या सर्व देणगीदारांचे आभार मानण्यात आले. हा उपक्रम सामाजिक बांधिलकी, संगीताची ताकद आणि जनसहभाग यांच्या माध्यमातून क्षयरुग्णांना आधार देणारा एक प्रेरणादायी आदर्श ठरला आहे.
0000

संबंधित पोस्ट

प्रत्येक पात्र मतदाराची अचूक नोंद सुनिश्चित करण्यासह ‘एसआयआर’च्या कामाला गती द्यावी मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्या सूचना

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे जिल्ह्यात भक्तीमय वातावरणात आगमन..

त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

गणेशभक्तांच्या सुखकर प्रवासासाठी जिल्ह्यात 10 ठिकाणी जनसुविधा केंद्र 

अहमदाबादमधील मेघानी नगर इथं सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ विमान अपघात.

प्रमाणित बियाणे वितरण बाबीमध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड जिल्ह्यांकरीता लक्षांक प्राप्त

vishwatmaklokswamivarta