vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

एकल महिलांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासन खंबीर; ३० जून रोजी जिल्हास्तरीय चर्चासत्राचे आयोजन

एकल महिलांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासन खंबीर; ३० जून रोजी जिल्हास्तरीय चर्चासत्राचे आयोजन

बुलढाणा प्रतिनिधी : जागतिक एकल महिला दिनानिमित्त जिल्हा महिला व बाल विकास विभाग, कृषी समृद्धी मल्टिपर्पज फाउंडेशन आणि आस्था संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने २३ जून रोजी ‘सखी निवास’ येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अमोल डिघुळे यांनी संकटांशी दोन हात करत कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या एकल महिलांच्या पाठीशी जिल्हा प्रशासन खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही दिली.
शासन स्तरावर सध्या एकल महिलांसाठी सर्वसमावेशक धोरण तयार केले जात असून या धोरणात कोणत्या घटकांचा समावेश असावा, याबाबत एकल महिलांनी आपल्या लेखी सूचना प्रशासनाकडे सादर कराव्यात, असे आवाहन अमोल डिघुळे यांनी केले. या धोरणाच्या पार्श्वभूमीवर आगामी ३० जून रोजी जिल्हा परिषद बुलढाणा येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ‘जिल्हास्तरीय चर्चासत्राचे’ आयोजन करण्यात आले असून या चर्चासत्रात जिल्ह्यातील एकल महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली स्पष्ट मते मांडावीत, असे आवाहनही त्यांनी पुढे बोलताना केले.
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या २०० व्या जयंती महोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाने हे एकल महिला धोरण निश्चित करण्यासाठी पुढाकार घेतला असून महिलांनी स्वतः पुढे येऊन आपले प्रश्न मांडणे गरजेचे असल्याचे मत मिशन वात्सल्य समितीच्या सदस्या आशा सिरसाट यांनी व्यक्त केले. तसेच एकल महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या विविध योजनांचा व कर्जाचा लाभ घ्यावा, बँकांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रशासन पूर्ण सहकार्य करेल, असा विश्वास मिटकॉनचे जिल्हा समन्वयक कैलास खराटे यांनी दिला. या प्रसंगी जिल्हा परिविक्षा अधिकारी सुरेषा पवार, रामेश्वर वसू व महेंद्र सौभागे यांनीही उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.

 

0000

संबंधित पोस्ट

सामाजिक अर्थसहाय्य योजनेच्या लाभासाठी पात्र लाभार्थींनी अर्ज करावेत- तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ-मिरज तालुक्यातील 1105 नव्या लाभार्थींना योजनेचा लाभ…

शेतकरी परदेश अभ्यास दौरा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचा पहिला गट परदेशात रवाना

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात चार हजार कोटींची अधिकची गुंतवणूक; उद्योजकांच्या पाठीशी शासन व प्रशासन खंबीरपणे उभे – पालकमंत्री शंभूराज देसाई

vishwatmaklokswamivarta

बालआनंद उत्सव-२०२५ सादरीकरणातून शिकाल जीवन जगण्याची कला- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाबाबत तज्ज्ञ समितीद्वारे सकारात्मक मार्ग काढणार –मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधी” (DEAF) बाबत बँकांकडून विशेष मोहिमेचे आयोजन,दावा न केलेल्या ठेवी परत मिळविण्यासाठ ठाणे जिल्ह्यातील 11 लाख 38 हजार 421 खातेदारांना आवाहन

vishwatmaklokswamivarta