vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

सामाजिक अर्थसहाय्य योजनेच्या लाभासाठी पात्र लाभार्थींनी अर्ज करावेत- तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ-मिरज तालुक्यातील 1105 नव्या लाभार्थींना योजनेचा लाभ…

सामाजिक अर्थसहाय्य योजनेच्या लाभासाठी पात्र लाभार्थींनी अर्ज करावेत- तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ-मिरज तालुक्यातील 1105 नव्या लाभार्थींना योजनेचा लाभ…

            सांगली, प्रतिनिधी : मिरज तालुकास्तरीय संजय गांधी योजना समितीच्या दि. 27 जानेवारी 2025 व दि. 21 मार्च 2025 रोजी बैठकीमध्ये श्रावणबाळ राज्य निवृत्ती वेतन योजनेतील 442, संजय गांधी निराधार योजना मिरज ग्रामीण 470, संजय गांधी निराधार योजना मिरज शहर 193 असे एकूण 1 हजार 105 नव्या लाभार्थींना नव्याने योजनेचा लाभ देण्यात आला आहे. सामाजिक अर्थसहाय्य योजनेच्या लाभासाठी मिरज तालुक्यातील पात्र लाभार्थींनी गावचे ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांच्याकडे अर्ज सादर करावेत, जेणेकरुन तालुक्यातील एकही पात्र लाभार्थी शासकीय योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, असे मिरज तहसिलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

  महसूल विभागाच्या 100 दिवस कृती कार्यक्रमात पारदर्शक, गतिमान लोकभिमुख प्रशासन नागरिकांना उपलब्ध करण्यासाठी कार्यालयीन गतिमानता अभियान अंतर्गत सुकर जीवनमान या घटकामध्ये नागरी सेवांचे सुलभीकरण करण्याच्या अनुषंगाने मिरज तालुक्यात संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत अभियान कालावधीमध्ये ग्राम महसूल अधिकारी यांच्यामार्फत गावामध्ये ज्या पात्र नागरिकांनी सामाजिक अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेतलेला नाही, अशा लाभार्थी यांची शोध मोहीम राबविण्यात आली. संबंधितांचे अर्ज प्राप्त करुन स्थानिक चौकशी करण्याची कार्यवाही विशेष शिबीर राबवून पूर्ण करण्यात आली. त्याअंतर्गत तालुकास्तरीय समिती मार्फत दि. 27 जानेवारी 2025 व दि. 21 मार्च 2025 रोजी संजय गांधी योजना समितीची बैठक घेण्यात आली असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

00000

संबंधित पोस्ट

जमिन सुधारणा उपाययोजना राबवा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

नव वर्षानिमित्त प्रत्येक कार्यालयाने संकल्प करा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 143 व्या जयंतीनिमित्त 31 मे रोजी ‘त्रिवेणी’ या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

राज्य लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी   – आयुक्त डॉ. किरण जाधव…

vishwatmaklokswamivarta

वाशिम, भंडारा, अंबरनाथ आणि पालघर येथील नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या कामांना गती द्या- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लोकप्रतिनिधींची उत्तरदायित्वाची भावना हाच सशक्त लोकशाहीचा पाया – 86व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेत प्रा. राम शिंदे यांचे प्रतिपादन• उत्तरदायित्व ही केवळ पाच वर्षांतून एकदा येणारी निवडणुकीपुरती मर्यादित प्रक्रिया नाही; ती प्रत्येक क्षणाची सततची जबाबदारी आहे…• विधिमंडळ हे अभ्यासपूर्ण चर्चेचे व्यासपीठ असावे; गडबड-गोंधळासाठीचे नव्हे…

vishwatmaklokswamivarta