vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

लाडक्या बहिणींच्या अनुदानातील कपात थांबवा नसता तीव्र आंदोलन छेडणार – कैलास गोरंटयाल

लाडक्या बहिणींच्या अनुदानातील कपात थांबवा नसता तीव्र आंदोलन छेडणार – कैलास गोरंटयाल

—जालना (प्रतिनीधी) ज्या लाडक्या बहिणींच्या बळावर सत्तेत आले.त्याच बहिणींच्या अनुदानात कपात करण्याचे पाप राज्यातील सत्ताधारी करत आहेत.जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनानुसार २१०० अनुदान तात्काळ द्यावे नसता लाडक्या बहिणींना सोबत घेऊन राज्य सरकार विरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंटयाल यांनी दिला आहे.

राज्यात काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा व शिंदे सेनेने सत्तेत आल्यानंतर राज्यातील महिलांना लाडक्या बहीण योजनेअंतर्गत प्रतीमहा २१०० रुपये अनुदान देण्याचे आश्वासन निवडणूक जाहीरनाम्यात दिले होते. या योजनेचा लाभ देण्यासाठी राज्यातील महीला भगिनिंकडून स्थानिक प्रशासनामार्फत अर्ज मागवून प्राप्त अर्जांची कोणतीही छाननी न करता तसेच योजनेचे कोणतेही निकष निश्चित न करता अर्ज करणाऱ्या सर्वच महीला भगिनींना पात्र ठरवत निवडणुकीपूर्वीच त्यांच्या बँक खात्यावर राज्य सरकारने अनुदानाची रक्कम वर्ग केली होती. यामुळे राज्यातील लाखो महीला मतदार भगिनींनी भाजपा व मित्र पक्षांच्या उमेदवारांच्या पारड्यात भरभरून मतदान टाकले. परिणामी राज्यात भाजपा व मित्र पक्षांचे सरकार सत्तारूढ झाले. मात्र, ज्या महिला भगिनिंच्या बळावर सत्ता काबीज केली त्या लाडक्या बहिणींना जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनानुसार प्रतिमहा २१०० रुपये अनुदान न देता सध्या देण्यात येत असलेल्या १५०० रुपयांच्या अनुदानात देखील कपात करण्याचे पाप राज्यातील सत्ताधारी करत असल्याची टीका माजी आमदार गोरंटयाल यांनी केली आहे. विविध योजने अंतर्गत देण्यात येत असलेल्या अनुदानाचा लाभ घेत असल्याचे कारण पुढे करून राज्य सरकार भरभरून मतदान करणाऱ्या महिला भगिनींवर मोठा अन्याय करत असल्याचा आरोप गोरंटयाल यांनी केला आहे. निवडणुकीत केवळ मतदानासाठी वापर करून आता त्याच महीला भगीनिंच्या अनुदानात कपात करण्याचा उद्योग राज्य सरकारने तात्काळ थांबवावा आणि निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार लाडकी बहिण योजनेसाठी पात्र ठरलेल्या सर्वच महीला भगिनींना प्रतीमहिना २१०० अनुदान द्यावे अशी मागणी करत राज्य सरकारने त्यासाठी आवश्यक पाऊल उचलले नाही तर अन्याय झालेल्या लाडक्या बहिणींना सोबत घेऊन राज्य सरकार विरुद्ध आगामी काळात काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा स्पष्ट इशारा माजी आमदार कैलास गोरंटयाल यांनी दिला आहे.


चौकट–शेतकऱ्यांना कर्जमाफी, मोफत वीज केव्हा देणार ?-विधानसभा निवडणुकीत अनेक खोटी आश्वासने देऊन सता काबीज करणाऱ्या भाजपा मित्र पक्षांच्या नेत्यांना आता आश्वासनांचा विसर पडला की काय ? असा सवाल उपस्थित करून माजी आमदार कैलास गोरंटयाल यांनी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि मोफत वीज केव्हा देणार असा प्रश्न राज्य सरकारला विचारला आहे.लाडक्या बहिणींना थापा मारणारे हे सरकार निवडणूक जाहीरनाम्यात आश्वासन देऊनही शेतकऱ्यांना देखील कर्जमाफी आणि मोफत वीज देण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचा आरोप करत लाडकी बहिण,शेतकऱ्यांसह सामान्य जनतेच्या हितासाठी लवकरच व्यापक आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंटयाल यांनी दिला आहे.

संबंधित पोस्ट

गुन्हेगारांविरोधात जलद कारवाईसाठी नवीन फौजदारी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी विभागीय कामाचे रँकीग नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत आढावा बैठक

शिवराज्याभिषेक सोहळा-2025 करिता जड-अवजड वाहनांकरिता वाहतुक बंदी आदेश जारी

भाजप आणि महायुतीवर जोरदार हल्लाबोल-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे

vishwatmaklokswamivarta

जळगाव जामोद नगरपरिषद अध्यक्षपदी भाजपचे गणेश दांडगे विजयी भाजपचे ९, काँग्रेसचे ५ सदस्य

vishwatmaklokswamivarta

छत्तीसगड मधल्या सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत २ नक्षलवादी ठार, नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्र साठा जप्त.

vishwatmaklokswamivarta

चढ्या दराने मद्यविक्री, १७ विक्रेत्यांवर कारवाई;साडेआठ लक्ष रुपये दंड..