vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

बुलढाण्यात जागतिक ग्राहक दिन उत्साहात साजरा

बुलढाण्यात जागतिक ग्राहक दिन उत्साहात साजरा

 

 बुलढाणा, प्रतिनिधी : जिल्हा पुरवठा कार्यालय आणि तहसील कार्यालय बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक ग्राहक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार व्ही. एस. कुमरे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात ग्राहक दिनाच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “ग्राहक हा प्रत्येक अर्थव्यवस्थेचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे ग्राहकांनी त्यांचे हक्क ओळखून योग्य ठिकाणी त्याचा वापर करावा. फसवणूक होऊ नये म्हणून सतर्कता बाळगणे गरजेचे आहे.”
 या कार्यक्रमात ग्राहक हक्क आणि संरक्षण याविषयी तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. यात अ. भा. ग्रा. पंचायतचे अध्यक्ष नगीनदास बैरागी आणि सचिव श्रीकांत अंधारे यांनी ग्राहक दिन साजरा करण्यामागील उद्देश स्पष्ट केला. यासोबतच ग्राहक हक्कांबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमात नागरिकांना त्यांच्या हक्कांची सविस्तर माहिती देण्यात आली.
यावेळी जिल्हा ग्राहक संरक्षण कक्षाच्या सदस्य ॲड. रत्नमाला गवई यांनी ग्राहक संरक्षण कायद्यांबद्दल माहिती देऊन ग्राहकांनी त्यांच्या हक्कांसाठी जागरूक राहण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमात नायब तहसीलदार शशिकांत वाघ उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात निरीक्षण अधिकारी नीलिमा उरकुडे यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी ग्राहक हक्कांचे महत्त्व आणि सध्याच्या काळात ग्राहकांनी त्यांच्या अधिकारांची जाणीव ठेवण्याची गरज स्पष्ट केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गायत्री सावजी यांनी केले, तर उपस्थितांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. ०००

संबंधित पोस्ट

मराठा आंदोलनामुळे महाराष्ट्रातील मालवाहतूक पूर्णपणे ठप्प,मुंबईतील अटल सेतू, नवी मुंबई मार्ग, पनवेल आणि इस्टर्न फ्री-वे हे मार्ग अवजड वाहनांकरिता बंद असल्याने कार्गो वाहतुकीवर मोठा परिणाम…

vishwatmaklokswamivarta

डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौ.फुटांचे घर; डबेवाला आंतरराष्ट्रीय अनुभव केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डबेवाल्यांना दिलासा

तलाव मासेमारी ठेक्यासाठी निविदा आमंत्रित

जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसविण्यासाठी दि.30 जून 2025 पर्यंत मुदतवाढ…

vishwatmaklokswamivarta

शहर सुंदर ठेवणा-या सुंदर हातांचा गौरव करणे आनंददायी – महापौर श्रीम.सुजाता पाटील

छत्रपती महाराणी ताराबाई यांचे कार्य सर्वदूर जाण्यासाठी लेखणीची गरज – श्रीमंत शाहू महाराज छत्रपती सांस्कृतिक कार्य विभागामार्फत तयार करण्यात आलेल्या महाराणी ताराबाई यांच्या जीवनावर आधारित विशेष चित्ररथाचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta