vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गतजिल्हा उद्योग केंद्राने गाठले कर्ज मंजुरीच्या 325 प्रस्तावाचे उद्दिष्ट..

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाअंतर्गतजिल्हा उद्योग केंद्राने गाठले कर्ज मंजुरीच्या 325 प्रस्तावाचे उद्दिष्ट..

जालना, प्रतिनिधी :- मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेअंतर्गत जालना जिल्ह्यासाठी सन 2024-25 वर्षाकरिता दिलेल्या 628 कर्ज मंजुरीच्या उद्दिष्टापैकी जिल्हा उद्योग केंद्र या कार्यालयाचे 1194 कर्ज प्रस्ताव बँकेकडे शिफारस करण्यात आले त्यात 263 कर्ज प्रस्तावांना बँकांनी मंजुरी दिलेली आहे. तसेच जिल्हा खादी व ग्रामोद्योग मंडळ या कार्यालयाचे 426 कर्ज प्रस्ताव बँकांकडे शिफारस करण्यात आले होते. यामध्ये 62 कर्ज प्रस्तावांना बँकांनी मंजुरी दिलेली आहे, असे एकूण 325 कर्ज मंजुरीचे (51.75%) उद्दिष्ट साध्य झाले आहे, अशी माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक योगेश सारणीकर यांनी दिली आहे.

सदर योजना अंतर्गत अनुसूचित जातीच्या 40, अनुसूचित जमातीच्या 4, इतर मागास प्रवर्गातील 115 व खुल्या प्रवर्गातील 166 लाभार्थ्यांना कर्ज मंजूर झाले आहे. तसेच 197 पुरुषांना व 128 महिलांना या योजनेचा लाभ प्राप्त झाला आहे. ग्रामीण भागातील 230 व शहरी भागातील 95 लाभार्थ्यांना सदर योजनेत कर्ज मंजूर झाले आहे. कर्ज मंजुरीचे हे उद्दिष्ट साध्य करण्याकरिता स्टेट बँक ऑफ इंडिया (70), महाराष्ट्र ग्रामीण बँक (63), बँक ऑफ महाराष्ट्र (45), व कोटक महिंद्रा बँक (34) या बँकांचे सहकार्य लाभले आहे.

सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता प्राप्त 1 हजार 300 प्रकरणांचे उद्दिष्ट पूर्तीसाठी ग्रामीण व शहरी तरुणांनी जास्तीत जास्त अर्ज योजनेच्या संकेतस्थळावर (www.maha-cmegp.gov.in) ऑनलाईन पद्धतीने भरावेत तसेच जिल्ह्यातील सर्व बँक व्यवस्थापकांनी अर्ज छाननी करून संकेतस्थळावर प्राप्त झालेल्या कर्ज प्रस्तावांना त्वरित कर्ज मंजुरी देऊन उद्दिष्ट पूर्तीसाठी सहकार्य करणे अपेक्षित आहे.

राज्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रातील सुशिक्षित युवक-युवतींची वाढती संख्या व उद्योग, व्यवसाय क्षेत्रात राज्यात विविध क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या नवीन संधी विचारात घेऊन उद्योजकतेला चालना देणारी व सर्जनशिलतेला कालानुरुप वाव देणारी राज्याची महत्वाकांक्षी अशी सर्वसमावेशक योजना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम सन 2019-20 या आर्थिक वर्षापासून राज्यात कार्यान्वित करण्यात आली आहे.

-*-*-*-

संबंधित पोस्ट

स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय समारोह मुंबईत; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण..

यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारासाठी प्रवेशिकांचे आवाहन; 30 जानेवारीपर्यंत मुदत

vishwatmaklokswamivarta

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी डिजिटल शिक्षण काळाची गरज – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकर्जत – जामखेडमधील १४० शाळांमध्ये डिजिटल शैक्षणिक साहित्याचे लोकार्पण,सभापती प्रा. राम शिंदे यांचा पुढाकार

पाणंद रस्ते कामांना गतीसाठी आमदारांच्या समितीला अधिकार- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

नंदुरबारमध्ये अयोग्य दर्जाचे खाद्यतेल प्रकरणात दोषींवर कारवाई करण्यात येणार-मंत्री नरहरी झिरवाळ

विज्ञान व नवोन्मेषातून मानवकल्याणाचा संदेश देणारे डॉ. माशेलकर यांचे कार्य प्रेरणादायी – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या ‘More from Less for More’ पुस्तकाचे मुंबईत प्रकाशन

vishwatmaklokswamivarta