vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नंदुरबारमध्ये अयोग्य दर्जाचे खाद्यतेल प्रकरणात दोषींवर कारवाई करण्यात येणार-मंत्री नरहरी झिरवाळ

नंदुरबारमध्ये अयोग्य दर्जाचे खाद्यतेल प्रकरणात दोषींवर कारवाई करण्यात येणार-मंत्री नरहरी झिरवाळ

मुंबई, प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) केलेल्या तपासणीत काही खाद्यतेल नमुने अयोग्य दर्जाचे आढळून आले असून, याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात येणार असून संबंधित कंपनी बंद करण्याची कार्यवाही केली जाईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

याबाबत सदस्य आमश्या पाडवी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी सदस्य समीर कुणावार, हिरामण खोसकर यांनीही उपप्रश्न उपस्थित केला.मंत्री श्री.झिरवाळ म्हणाले, दि. १० मार्च २०२५ रोजी अक्कलकुवा येथील मे. गोपाल प्रोव्हिजन या आस्थापनाची तपासणी करताना महिका ब्रँडचे रिफाईन्ड सोयाबीन तेल व कमला ब्रँडचे शेंगदाणा तेल या अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले होते. प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार हे नमुने अन्न सुरक्षा मानकांनुसार अप्रमाणित आढळले. विक्रेत्याने अपील केल्यामुळे नमुने फेरविश्लेषणासाठी सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट, मैसूर येथे पाठविण्यात आले आहेत. सन २०२४-२५ या कालावधीत नंदुरबार जिल्ह्यात खाद्यतेलाचे एकूण १२ नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी ५ नमुने अयोग्य दर्जाचे घोषित करण्यात आले आहेत. त्यातील २ प्रकरणांमध्ये अन्न सुरक्षा व मानके कायदा, २००६ अंतर्गत कारवाई सुरू असून उर्वरित ३ नमुने रेफरल प्रयोगशाळेकडून तपासणी अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत.

 अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलली जातील असे मंत्री श्री. झिरवाळ यांनी यावेळी सांगितले

संबंधित पोस्ट

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या 61 गटांसाठी आरक्षण सोडत जाहीर..

vishwatmaklokswamivarta

कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे राज्यात पुन्हा एकदा भाजपा पहिल्या क्रमांकावर आल्याचं सांगत आता मतदारांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही.

vishwatmaklokswamivarta

जिल्हा उद्योग मित्र समितीच्या माध्यमातून गत आठ महिन्यात उद्योजकांचे अनेक प्रश्न मार्गी- जिल्हाधिकारी अशोक काकडे- तीन क्लस्टरचे काम पूर्ण, पाच क्लस्टरला मंजुरी- उद्योग विभागाच्या समित्यांच्या आढावा बैठकीत दिली माहिती

vishwatmaklokswamivarta

शालेय विद्यार्थ्यांत आत्मसंयम, मूल्याधिष्ठित जीवनशैली,व्यसन परावृत्तीबाबत जागृती करणारा संयम उपक्रम- पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची संकल्पना- शिक्षक प्रशिक्षणात 600 शिक्षकांचा सहभाग

vishwatmaklokswamivarta

मोठी बातमी – राज्यातील गडचिरोली येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर ६१माओवाद्यांनी ५४ अग्निशस्त्रांसह गणवेशात केले आत्मसमर्पण…

vishwatmaklokswamivarta

दिशा सालियान मृत्यू प्रकरण- वडिलांनी उभाठा नेते आदित्य ठाकरे, रिया चक्रवर्ती आणि इतरांविरुद्ध एफआयआर दाखल,नव्याने सीबीआय चौकशीची मागणी…