vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा – २०२५समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा – २०२५

समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा – २०२५समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा – २०२५

जालना, प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या शासन पत्र क्र. संकिर्ण २०२२/प्र.क्र. ८१/ टीएनटी १, दि. १५/०९/२०२२ व शासन निर्णय दि. २९/०८/२०२५ अन्वये महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी “समूह साधन केंद्र समन्वयक (केंद्र प्रमुख) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा – २०२५” या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने दि. ०१/१२/२०२५ ते ०५/१२/२०२५ | या कालावधीत आयोजन करण्यात येणार असले बाबत दि. २९/०९/२०२५ रोजी प्रसिध्द करण्यात आले होते. परीक्षेबाबतची अधिसूचना, वेळापत्रक व ऑनलाईन आवेदनपत्राबाबतची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली होती.

तथापि काही तांत्रिक व प्रशासकीय कारणास्तव सदर परीक्षेचे आयोजन जानेवारी / फेब्रुवारी २०२६ मध्ये घेण्याचे नियोजित असून सुधारीत परीक्षेच्या तारखा यथावकाश परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येतील.

सदर परिक्षेसाठी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याची मुदत दि. १०/११/२०२५ होती. तरी सदर आवेदनपत्र भरणेची मुदत दि.०१/०१/२०२६ पर्यंत करण्यात येत आहे. त्यामुळे उमेदवारांचा अनुभव, शैक्षणिक पात्रता ही दि.०१/०१/२०२६ रोजीची अंतिम समजण्यात येईल. त्यानुसार सर्व पात्र उमेवारांनी / परीक्षार्थीनी विहीत मुदतीत आवेनदपत्र भरण्याची कार्यवाही करण्याचे अनुराधा ओक आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी कळविले आहे.

संबंधित पोस्ट

सातत्यपूर्ण प्रयत्न आणि समर्पित भावनेनेकार्य करून जीवनात यशस्वी व्हा- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन-सिम्बायोसिस विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभ

राज्यपालांच्या हस्ते नवभारत कॉर्पोरेट सामायिक दायित्व पुरस्कार प्रदान सारा तेंडुलकर सन्मानित

vishwatmaklokswamivarta

सायबर गुन्ह्यात ‘फ्रीज’ केलेल्या बँका खात्यांना पोलिस प्रमाणपत्रावर बँकांनी खुले करावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

२ रे वैदर्भीय आंबेडकरी महिला संमेलन अध्यक्षपदी डॉ. रेखा मेश्राम यांची निवड 

आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना प्रभावीपणे करण्यासाठी तसेच जीवित व वित्तहानी टाळण्याच्या दृष्टीने नांदेड तालुकास्तरीय आढावा बैठक..

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत प्रशिक्षण कालावधीत वाढ..