vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

आरोग्य विभागाने माहेरघर योजना कार्यरत आरोग्य सेविकांचा पुढाकार

आरोग्य विभागाने माहेरघर योजना कार्यरत आरोग्य सेविकांचा पुढाकार

अमरावती, प्रतिनिधी प्राथमिक आरोग्य केंद्र टेंभूरसोंडा येथे राबविण्यात येत असलेल्या माहेरघर योजना तसेच जे.एस.एस.के. (जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम) योजनेअंतर्गत प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीपश्चात मातांना आहार पुरविण्यात येतो.

भूरसोंडा येथील मूळ माहेरघर नादुरुस्त असल्यामुळे, पर्यायी व्यवस्था म्हणून प्रसूतीपूर्व व प्रसूतीपश्चात मातांना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वॉर्डातच भरती केले जात आहे. भरती झालेल्या मातांना श्री विशाल गावंडे, वैदेही भोजनालय, टेंभूरसोंडा यांच्यामार्फत दोन वेळचे जेवण पुरवले जात होते. परंतु, संबंधित पुरवठाधारक यांच्या पत्नीची प्रकृती ठीक नसल्यामुळे माहे ऑक्टोबरपासून जेवणाचा पुरवठा होऊ शकला नाही. या कारणामुळे श्री वायकर भोजनालय, टेंभूरसोंडा यांच्याकडे तात्पुरती व्यवस्था सोपवण्यात आली होती, परंतु त्यांच्याकडूनही भरती झालेल्या मातांना जेवणाचा पुरवठा करण्यात आला नाही.

जेवण पुरवठा खंडित झाला असताना, आरोग्य सेविका यांनी स्वतः पुढाकार घेऊन प्रसूतीपूर्व व प्रसूतीपश्चात मातांसाठी जेवणाची व्यवस्था केली होती. आरोग्य विभागाने आता जेवण पुरवठा नियमित चालू केला आहे.तसेच, भविष्यात जेवणात खंड पडू नये म्हणून पुरवठा आदेश धारकांना ताकीदही देण्यात आली आहे.आरोग्य विभागाने माहेरघर योजना कार्यरत असल्याचे स्पष्ट केले असून, केवळ पुरवठाधारकांच्या वैयक्तिक अडचणीमुळे तात्पुरता खंड पडला होता, असे नमूद केले आहे.

000000

संबंधित पोस्ट

नेत्रदान पंधरवड्यानिमित्त जनजागृतीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

22 मार्चपर्यंत सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहिम;मोहिमेस नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन..

एड्स नियंत्रण आणि राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावा – जिल्हाधिकारी संतोष पाटील

भारताने पहिले स्वदेशी प्रतिजैविक “नॅफिथ्रोमायसिन” विकसित केले, जे प्रतिरोधक श्वसन संसर्गाविरुद्ध प्रभावी आहे, विशेषतः कर्करोग आणि अनियंत्रित मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी उपयुक्त आहे

vishwatmaklokswamivarta

कामोठे येथे जागतिक क्षयरोग दिन कार्यक्रम संपन्न

निराधार मुलांचे आधार नोंदणी व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न- साथी मोहिमेंतर्गत 19 अनाथ, निराधार बालकांना आधार ओळखपत्र..