vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मेळाव्यात 12 कोटींचे कृषिकर्ज वितरण

सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मेळाव्यात 12 कोटींचे कृषिकर्ज वितरण

अमरावती, प्रतिनिधी) : सेंट्रल बँक ऑफ इंडियातर्फे आज पथरोट येथे कृषि कर्ज वितरण मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात 12 कोटी रूपयांचे कर्जवाटप करण्यात आले.

पथरोटचे उपसरपंच अतुल वाठ मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते, तर सेंट्रल बँकेच्या सेंट्रल ऑफिसचे महाप्रबंधक डॉ. भास्कर, तसेच अमरावती क्षेत्रिय प्रमुख सुनील पाण्डेय, अचलपूरचे गटविकास अधिकारी सुधीर अरबाट उपस्थित होते.डॉ. भास्कर यांच्या उपस्थितीत ग्राहकांना सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे कृषि कर्ज वितरीत करण्यात आले. त्यांनी उपस्थित ग्राहक, नागरिकांना सेंट्रल बँकेच्या विविध कर्ज योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. मेळाव्यात सेंट्रल बँक क्षेत्रीय कार्यालयाचे मुख्य प्रबंधक दीपक दाबोले, राजकुमार तरते यांनी कृषि कर्जाच्या विविध योजना, तसेच कोल्ड स्टोरेज, पोल्ट्री फार्म योजना, फूड प्रोसेसिंग, किसान व्हीकल, पीएम कुसुम योजना, कृषि इंफ्रास्ट्रक्चर फंड, बचतगट कर्ज योजनांची माहिती दिलीसेंट्रल बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय प्रमुख सुनील पांडे यांनी प्रास्ताविक केले. निलेश मुंडेकर यांनी सूत्रसंचालन केले. अग्रणी बँक व्यवस्थापक नरेश हेडाऊ यांनी आभार मानले.

0000

संबंधित पोस्ट

नूतन वर्ष महाराष्ट्राचे, महाराष्ट्राच्या समृद्धीचे, विकासाचे नवपर्व आणणारे -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवर्षप्रारंभाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

vishwatmaklokswamivarta

नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी सूक्ष्म नियोजन करावे– जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- आपत्ती व्यवस्थापन पूर्वतयारीचा घेतला आढावा- पूरबाधित गावांची संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न करूया- नागरिकांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना…

हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंतीनिमित्त अभिवादन

विविध बँकांमध्ये दावा न केलेल्या ठेवी खातेदारांना परत मिळण्याकरीता बँकांशी संपर्क साधण्याचे आवाहन

रणजित मोहन यादव यांनी ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील पर्यटनाला मिळणार ‘होमस्टे’ची जोड; स्थानिकांना रोजगाराची संधी

vishwatmaklokswamivarta