vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नूतन वर्ष महाराष्ट्राचे, महाराष्ट्राच्या समृद्धीचे, विकासाचे नवपर्व आणणारे -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवर्षप्रारंभाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

नूतन वर्ष महाराष्ट्राचे, महाराष्ट्राच्या समृद्धीचे, विकासाचे नवपर्व आणणारे -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवर्षप्रारंभाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा…

 

मुंबई,  प्रतिनिधी –

नूतन वर्ष महाराष्ट्राचे, महाराष्ट्राच्या समृद्धीचे, विकासाचे नवपर्व आणणारे ठरेल, असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना नववर्ष प्रारंभाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सरत्या वर्षाला निरोप देताना आणि नवीन वर्ष प्रारंभाच्या पूर्वसंध्येला दिलेल्या शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, ‘सरत्या वर्षातील कटू प्रसंगांना विसरूया आणि सुमधूर आठवणींकडून प्रेरणा घेत, पुढे जाऊया. महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात अग्रेसर, नेतृत्व करणारे राज्य आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीची पताका अशीच फडकत राहो, यासाठी आपण एकजूट करूया. महाराष्ट्राच्या मातीत आव्हाने स्वीकारण्याची धमक आहे. आव्हाने आलीच, तर त्यावर मात करण्याचा निर्धार करुया. नवे वर्ष नवचैतन्य घेऊन येणारे, आशा, आकांक्षांना बळ देणारे ठरेल, अशी आशा व्यक्त करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी नववर्ष सर्वांसाठी आरोग्यदायी, सर्वच क्षेत्रात भरभराट, समृद्धी घेऊन येणारे ठरावे, अशा शुभेच्छा दिल्या.

 

0000

 

 

संबंधित पोस्ट

स्वाधार योजनेअंतर्गत अर्ज करण्यास 15 जानेवारीपर्यंत मुदतवाढ…

 मुंबईसह रायगड जिल्ह्यात 2 ते 4 जुलैदरम्यान अतिमुसळधार पावसाची शक्यता नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

कोकण-गोदावरी नदीजोड प्रकल्प सर्वेक्षण कामाचा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी घेतला आढावा

राज्यात गृहनिर्माण सोसायट्यांच्या व्यावसायिक गाळ्यात बियर किंवा दारुचे दुकान सुरु करायचे असेल तर यापुढे संबंधित सोसायटीचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ बंधनकारक-उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत जाहीर केली. 

15 हजारहून अधिक थकबाकीदारांनी अभय योजनेचा लाभ घेत जमा केला 81 कोटी कर**अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी शेवटचे चार दिवस बाकी!सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध*

शेतकऱ्यांनो, आत्महत्येचा मार्ग अवलंबू नका – आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रवीशंकर यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta