vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

विदर्भ-मराठवाड्यात ‘दुग्ध विकास प्रकल्प टप्पा-2’ सुरु; शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यावर भर

विदर्भ-मराठवाड्यात ‘दुग्ध विकास प्रकल्प टप्पा-2’ सुरु; शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यावर भर

            अमरावती, प्रतिनिधी : विदर्भ आणि मराठवाडा या दोन्ही विभागातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि दुग्ध व्यवसायाला गती मिळावी या उद्देशाने राज्य सरकारने विदर्भ मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पाचा दुसरा टप्पा सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यास सुरुवात केली आहे.

उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या दुधाळ गायी-म्हशींचे 50 टक्के अनुदानावर वाटप, तसेच आयव्हीएफ तंत्रज्ञानाद्वारे गाभण कालवडींचे 75 टक्के अनुदानावर वाटप ही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. याशिवाय, कडबा कुट्टी यंत्रांसाठी 50 टक्के अनुदान, पशुखाद्य आणि फॅटवर्धक खाद्यासाठी 25 टक्के अनुदान तसेच 100 टक्के अनुदानावर वैरण बियाणे पुरविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना मुरघास निर्मितीसाठी प्रतिकिलो 3 रुपये अनुदान मिळणार असून, दुधाच्या विक्रीसाठी मराठवाडा दूध उत्पादक कंपनीशी करार करण्यात आला आहे. पशुपालकांनी या सर्व योजनांसाठी vmddp.com या संकेतस्थळावर नोंदणी करावी किंवा अधिक माहितीसाठी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय जिल्हा उपायुक्त डॉ. संजय कावरे यांनी केले आहेजिल्हा वार्षिक योजनेतंर्गत वैरण विकास कार्यक्रम राबविण्यात येत असून या अंतर्गत प्रति व्यक्ती 4 हजार रुपयांचे वैरण बियाणे 100 टक्के अनुदानावर प्राप्त होत आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु असून पशुपालकांनी पशुवैद्यकीय चिकित्सालयात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

000000

संबंधित पोस्ट

शास्त्रीय कला, चित्रकला व लोककला सवलतीच्या प्रस्तावांना वाढीव मुदत· 31 जानेवारी अंतीम मुदत

पैठण-संत एकनाथ महाराज  नाथषष्ठी यात्रोत्सवानिमित्त वाहतूक मार्गात बदल…

भूकंपादरम्यान घ्यावयाच्या खबरदारीविषयी जनजागृती कराव-जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड• हिंगोली जिल्ह्यातील भूकंपाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणांचा आढावा• नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहण्याचे आवाहन

खोपोली येथे विशेष वित्तीय समावेशन शिबिर संपन्न रिझर्व्ह बँक अधिकाऱ्यांची उपस्थिती

vishwatmaklokswamivarta

भगवान महावीर अध्यासनासाठी शासनाकडून सर्वोतोपरी सहकार्य – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

सिपेट अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात…

vishwatmaklokswamivarta