पैठण-संत एकनाथ महाराज नाथषष्ठी यात्रोत्सवानिमित्त वाहतूक मार्गात बदल…
छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- पैठण येथे दि.१८ ते २२ या कालावधीत संत एकनाथ महाराज नाथषष्ठी यात्रोत्सव आहे. राज्यभरातून अंदाजे १२ ते १५ लाख भाविक विविध वाहनाने वा पायी यात्रा उत्सवाकरीता येत असतात. या कालावधीत वाहतुकीची कोंडी निर्माण होऊ नये यासाठी पैठणकडे जाणारी व येणारी जड वाहतूक मार्गात बदल करण्यात येत असल्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ.विनयकुमार राठोड यांनी निर्गमित केले आहेत.
वाहतुक मार्गातील बदल याप्रमाणे-पूर्वीचा जड वाहतूक मार्गः-१. शहागड कडून – आपेगाव मार्गे पैठणकडे२. पाचोड – पैठण- बिडकीन – इसारवाडी फाटा – अहिल्यानगर हायवे३. सोलापूर धुळे एनएच – ५२ महामार्ग कचनेर फाटा, पोरगाव चौफुली, बिडकीन – शेकटा – इसारवाडी फाटा – छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर हायवे मार्गे अहिल्यानगर कड
४. जालना कडून करमाड – कचनेर फाटा – पोरगाव – बिडकीनचे शेकटा इसारवाडी फाटा – छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर हायवे मार्गे अहिल्यानगर कडे अथवा छत्रपती संभाजीनगर कडे५. छत्रपती संभाजीनगर ते बिडकीन – पैठण कडे६. छत्रपती संभाजीनगर ते बिडकीन – पैठण कडे७. शेवगाव जि.अहिल्यानगर कडून पैठण मार्गे छत्रपती संभाजीनगर कडे जाणारी जड वाहतू
पर्यायी जड वाहतूक मार्गः-१. शहागड – पाचोड – मार्गे छत्रपती संभाजीनगर कडे जाईल.२. पाचोड – आडूळ – छत्रपती संभाजीनगर बाय पास मार्गे अहिल्यानगरकडे३. सोलापूर धुळे एनएच -५२ महामार्ग बीड कडून येणारी जड वाहतूक ही एनएच -५२ मार्ग ते सरळ पुढे ए-एस क्लब मार्गे छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर हायवेने अहिल्यानगरकडे जातील. याचप्रमाणे उलट दिशेने वाहने ये जा करतील.४. जालनाकडून येणारी जड वाहतूक ही करमाड – कचनेर फाटा – सोलापूर धुळे एनएच-५२ महामार्ग ते सरळ पुढे ए-एस क्लब मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे किंवा छत्रपती संभाजीनगर कडे जातील. या प्रमाणेच उलट दिशेने वाहने ये-जा करतील.५. छत्रपती संभाजीनगर – वाळूज पैठण खेडा – रांजणगाव खैरी – शेकटा ब्रह्मगव्हाण – लोहगाव – जळगाव – जळगाव लोहगाव फाटा – ढोरकीन – मार्गे पैठण कडे जातील. या प्रमाणेच उलट दिशेने वाहने ये – जा करतील.६. छत्रपती संभाजीनगर पाचोड मार्गे पैठणकडे जातील. या प्रमाणेच उलट दिशेने वाहने ये-जा करतील.७. शेवगाव – नेवासा फाटा – वाळुजमार्गे – छत्रपती संभाजीनगर कडे जातील.०००००