vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

जिल्ह्यातील रुग्णांनी आता घर बसल्या मोफत बाह्य रुग्ण सेवेचा लाभ घ्यावा

जिल्ह्यातील रुग्णांनी आता घर बसल्या मोफत बाह्य रुग्ण सेवेचा लाभ घ्यावा

जालना, प्रतिनिधी:- ई-संजीवनी ओपीडी अंतर्गत आपल्या मोबाईलद्वारे ऑनलाईन घर बसल्या मोफत बाह्य रुग्ण सेवेचा तज्ज्ञाकडुन आरोग्य सेवाचा लाभ घ्यावा. ही सुविधा आपणास सोमवार ते शनिवार सकाळी 9 ते दुपारी 1 व दुपारी 1.45 ते 5 वाजेपर्यंत ऑनलाईन उपलब्ध राहणार आहे.

जिल्हा रुग्णालय जालना येथे आयुष्यमान आरोग्य मंदीर टेली कन्सल्टेशन हब कार्यरत आहे. येथे 3 विशेषज्ञ व 2 वैद्यकिय अधिकारी कार्यरत आहे. यासाठी https://esanjeevani.mohfw.gov.in/#/ किंवा क्यु आर कोड स्कॅन करावा. ई-संजीवनी ओपीडी अंतर्गत आपल्या मोबाईलच्या सहाय्याने पुढीलप्रमाणे प्रक्रिया करावी. प्रथमत: आपला मोबाईल नंबर सत्यापित (व्हेरिफाय) करा. नोंदणी झाल्यानंतर टोकन जनरेट करा. नोटीफिकेशन मिळाल्यानंतर लॉग इन करा. तुमचा नंबर येईपर्यंत वाट पहावी व त्यानंतर डॉक्टरांशी सल्ला घ्यावा. ई-प्रिस्क्रीप्शन डाऊनलोड करा. अशाप्रकारे आपणास घर बसल्या रुग्ण सेवेचा लाभ घेता येईल. असे जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे 12 ऑगस्ट रोजी आयोजन

टीबी मुक्त ग्रामपंचायतींना 28 कास्य, 136 रोप्य मानांकनाने सन्मानित  टीबी मुक्त जिल्हा करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील रहा- जिल्हाधिकारी अशोक शिनगारे..

गडचिरोली जिल्हा रुग्णालयाची मोठी कामगिरी! दोन गुंतागुंतीच्या ओव्हेरियन ट्युमर शस्त्रक्रिया यशस्वी! 

विशेष लेख-डेंग्यु:नियंत्रण व उपाययोजना

श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातूनआतापर्यंत ३.२६ लाख नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी· ६,८६२ नागरिकांनी केले रक्तदान

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगेयांची शहापूर तालुक्यातील शेणवा प्राथमिक आरोग्य केंद्रास “सरप्राईज व्हिजिट”आरोग्य व्यवस्था पाहून व्यक्त केले समाधान