vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शासकीय वसतिगृहांसाठी प्रवेश प्रक्रिया 26 ऑक्टोबरपर्यंत सुरू

शासकीय वसतिगृहांसाठी प्रवेश प्रक्रिया 26 ऑक्टोबरपर्यंत सुरू

             सांगली, प्रतिनिधी) : इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सांगली जिल्ह्याच्या ठिकाणी मुलांसाठी 100 विद्यार्थी क्षमतेचे एक व मुलींसाठी 50 विद्यार्थी क्षमतेचे एक अशी दोन वसतिगृहे शासनाकडून सुरु करण्यात आली आहेत. या वसतिगृहासाठी प्रवेश प्रक्रिया दि. 26 ऑक्टोबर 2025 पर्यंत सुरु असून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण, सांगली कार्यालयाच्या सहाय्यक संचालक धनश्री भांबुरे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

               इतर मागास प्रवर्ग,विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील 12 वी नंतरच्या बिगर व्यावसायिक व व्यावसायिक प्रथम वर्ष व थेट व्दितीय वर्ष अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी वसतीगृहात प्रवेश मिळण्याकरिता https://hmas.mahait.org/ या संकेतस्थळास भेट देऊन ऑनलाईन अर्ज करावा. त्या अर्जाची प्रत व त्याअनुषंगीक सर्व कागदपत्रे (सहाय्यक संचायक, इतर मागास बहुजन कल्याण, सांगली यांचे कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,जुना बुधगांव रोड,सांगली) या कार्यालयास दि. 27 ऑक्टोबर 2025 पर्यंत जमा करावीत. अधिक माहितीसाठी मुलांचे वसतिगृहासाठी अधिक्षक मोबा. क्र. 9763491019 व मुलींच्या वसतिगृहासाठी अधिक्षिका मोबा. क्र. 8766954163 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

000000

संबंधित पोस्ट

इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनीने घेतली मुख्यमंत्र्यांची मुलाखत;**पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वहाळ येथे शाळा प्रवेशोत्सव प्रसंगी डिजिटल शिक्षणाबाबत दिला प्रेरणादायी संदेश*

नव्या भारताचे नवे कायदे-भारतीय न्याय संहिता २०२३’’ या विषयावरील मल्टिमीडीया छायाचित्र प्रदर्शन आज पासूनप्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनायक जोशी यांच्या हस्ते उदघाटन..

नवी मुंबई महानगरपालिका*प्रसिध्दीकरिता-महाराष्ट्र दिनी सीईआर निधीतून नवी मुंबई महानगरपालिकेस आयकियामार्फत 2 सक्शन वाहने प्रदान,केंद्र सरकारच्या नमस्ते योजने अंतर्गत 230 सफाई मित्रांना पीपीई किटचे वाटप व प्रशस्तीपत्रे वितरण

महाराष्ट्र व गुजरात देशाच्या विकास आणि जागतिक पटलावर नाव चमकणारी राज्ये : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

प्रगत, संपन्न महाराष्ट्र साकारण्यासाठी कटिबद्ध होऊया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र दिन, कामगार दिनाच्या शुभेच्छा

सायन कोळीवाडा विधानसभा क्षेत्रात भाजपा आमदार तामिळ सेलवन यांच्या नेतृत्वाखाली भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन

vishwatmaklokswamivarta