vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभासाठी प्रवेश अर्ज 26 ऑक्टोबरपर्यंत करण्याची मुदत..

पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभासाठी प्रवेश अर्ज 26 ऑक्टोबरपर्यंत करण्याची मुदत..

     सांगली, प्रतिनिधी: पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेतंर्गत 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमास (बिगर व्यावसायिक व व्यावसायिक अभ्यासक्रम) महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्षाकरिता तसेच थेट द्वितीय वर्षाकरिता ऑनलाईन प्रवेश अर्ज दि. 26 ऑक्टोबर 2025 पर्यंत hmas.mahait.org या संकेतस्थळावर भरता येणार आहे. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट इतर मागास बहुजन कल्याण, सांगली यांच्या कार्यालयात दि. 27 ऑक्टोबर 2025 पर्यंत जमा करणे बंधनकारक असल्याचे इतर मागास बहुजन कल्याण, सांगली कार्यालयाच्या सहाय्यक संचालक धनश्री भांबुरे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

  राज्यातील सर्व महानगरपालिका, विभागीय शहरे आणि जिल्हास्तरीय शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेत असलेल्या मान्यताप्राप्त शासकिय, अनुदानित व कायम विनाअनुदानित महाविद्यालये, तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश घेणाऱ्या व वसतिगृह योजनेपासून वंचित असणाऱ्या भटक्या जमाती -क धनगर प्रवर्गातील विद्यार्थी निवासी व शैक्षणिक सुविधांपासून वंचित राहू नये यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजना सुरु करण्यात आली आहे.

 या योजनेचा लाभ घेण्यासाठी इयत्ता 12 वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असलेल्या परंतु वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना व ज्यांच्या पालकाचे उत्पन्न रक्कम रुपये 2 लाख 50 हजार रूपये पेक्षा कमी आहे, असे विद्यार्थी पात्र असून जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांस प्रतिवर्ष 43 हजार रूपये व तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास प्रतिवर्ष 38 हजार रूपये प्रमाणे लाभाचे वितरण केले जाणार आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या धनगर समाजातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक संचालक धनश्री भांबुरे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

दहावी निकाल रायगड जिल्ह्यातील ९६.२५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण: मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त

vishwatmaklokswamivarta

प्राणी क्लेश क्लेश प्रतिबंधक समिती; अशासकिय सदस्य नियुक्तीसाठी अर्ज आमंत्रित

vishwatmaklokswamivarta

मानवी जाणिवा कायम ठेवून प्रशासकीय कामकाज करा- ॲड. धर्मपाल मेश्राम पारधी समाज बांधवांची विविध विषयावर निवेदने, मागण्या सादर..

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी व्हावेजिल्ह्यातील मंडळांना ७ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र एमएसएमई समिट व पुरस्कार २०२६ ला उत्स्फूर्त प्रतिसाद

नवीन पूल बाबूपेठवासियांसाठी चंद्रपूरशी मने जोडणारा दुवा ठरेलआमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी उड्डाणपुलाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव…