vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

दहावी निकाल रायगड जिल्ह्यातील ९६.२५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण: मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त

दहावी निकाल रायगड जिल्ह्यातील ९६.२५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण: मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त

राज्य प्रतिनिधी

विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणाऱ्या दहावी परिक्षेचा निकाल‌ मंगळवारी (दि.१३) ऑनलाईन जाहिर करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील ९६.२५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालात मुलांच्या तुलनेत मुलींनी बाजी मारली असून, मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९७.२६ टक्के तर मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९५.३१ टक्के इतके आहे. दहावी परीक्षे उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी अभिनंदन केले असून, परीक्षेत यश न मिळालेल्या विद्यार्थांनी खचून न जाता पुन्हा जोमाने अभ्यास करून यश प्राप्त करावे असा सल्ला दिला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे मार्च, २०२५ मध्ये इयत्ता दहावीची परिक्षा घेण्यात आली होती. या परिक्षेचा निकाल मंगळवारी मंडळाच्या संकेतस्थळांवर दुपारी १ वाजता जाहीर करण्यात आला. दहावीच्या परिक्षेसाठी रायगड जिल्ह्यातून ३५ हजार ६१२ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी ३५ हजार ३९४ विद्यार्थी परिक्षेला सामोरे गेले.‌ यामधील ३४ हजार ६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, १ हजार ३२७ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९६.२५ टक्के इतके आहे.

 

रोहा तालुक्याचा सर्वात जास्त निकाल-रायगड जिल्ह्यात दहावी परीक्षेत रोहा तालुक्याने बाजी मारली आहे. रोहा तालुक्यातील ९७.१२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर पनवेल ९६.८८, उरण ९५.७८, कर्जत ९६.६८, खालापूर ९३.७५, सुधागड ९१.२८, पेण ९५.४९, अलिबाग ९६.७६, मुरुड ९६.१९, माणगाव ९६.४८, तळा ९६.४०, श्रीवर्धन ९५.८३, म्हसळा ९५.५३, महाड ९७.०७, पोलादपूर ९५.०७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

संबंधित पोस्ट

मराठवाड्यात ३ लाख १६ हजारांहून अधिक कुणबी प्रमाणपत्रांचे वाटपजात पडताळणीची १६ हजारांहून अधिक प्रकरणे निकालीशासनाच्या सकारात्मक कार्यवाहीची उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून माहिती ५७ लाख नोंदी जनतेसाठी संकेतस्थळावर उपलब्ध

vishwatmaklokswamivarta

राज्यात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या अनधिकृत बाईक टॅक्सी सेवांविरोधात परिवहन विभागाने कठोर भूमिका घेतली आहे.ओला,उबर आणि रॅपिडो सारख्या अनधिकृत बाईक टॅक्सी ॲप सेवा तात्काळ बंद करून संबंधित कंपनी मालकांवर एफआयआर दाखल करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

लातूर जिल्ह्यात १७ कृषी निविष्ठा केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द

vishwatmaklokswamivarta

अरुणोदय वॉकर्स चा 32 वे स्नेहसंमेलन बांद्राच्या एमआयजी मध्ये उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

महिला बचत गटांच्या महिलांचा मालमत्ताकर बिल वाटपास ‘हातभार’; ३० दिवसांतच विक्रमी बिल वाटप!तब्बल २१२ कोटींचे करसंकलन; ‘ऑनलाइन’ स्वरूपात कर भरण्यास करदात्यांची पसंती!बिल वाटप मोहिमेमध्ये तब्बल २०० महिलांचा सहभाग३० जूनपूर्वी कर भरून सवलत घेण्याचे आवाहन!

खोपोली येथे विशेष वित्तीय समावेशन शिबिर संपन्न रिझर्व्ह बँक अधिकाऱ्यांची उपस्थिती

vishwatmaklokswamivarta