vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या लाभासाठी प्रवेश अर्ज 26 ऑक्टोबरपर्यंत करण्याची मुदत..

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या लाभासाठी प्रवेश अर्ज 26 ऑक्टोबरपर्यंत करण्याची मुदत..

    सांगली, प्रतिनिधी,  ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेंतर्गत या योजनेतंर्गत 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतेलेल्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमास (बिगर व्यावसायिक व व्यावसायिक अभ्यासक्रम) महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम वर्षाकरिता तसेच थेट द्वितिय वर्षाकरिता ऑनलाईन अर्ज दि. 26 ऑक्टोबर 2025 पर्यंत hmas.mahait.org या संकेतस्थळावर प्रवेश अर्ज भरता येणार आहे. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट इतर मागास बहुजन कल्याण, सांगली यांच्या कार्यालयात दि. 27 ऑक्टोबर 2025 पर्यंत जमा करणे बंधनकारक असल्याचे इतर मागास बहुजन कल्याण, सांगली कार्यालयाच्या सहाय्यक संचालक धनश्री भांबुरे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

          राज्यातील सर्व महानगरपालिका, विभागीय शहरे आणि जिल्हास्तरीय शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेत असलेल्या मान्यताप्राप्त शासकिय, अनुदानित व कायम विनाअनुदानित महाविद्यालये, तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश घेणाऱ्या व वसतिगृह योजनेपासून वंचित असणाऱ्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती (भटक्या जमाती – क धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून) आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थी निवासी व शैक्षणिक सुविधांपासून वंचित राहू नये यासाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरु करण्यात आली आहे.

 या योजनेचा लाभ घेण्यासाठी इयत्ता 12 वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असलेल्या परंतु वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना व ज्यांच्या पालकाचे उत्पन्न रक्कम रुपये 2 लाख 50 हजार रूपये पेक्षा कमी आहे, असे विद्यार्थी पात्र असून जिल्ह्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांस प्रतिवर्ष 43 हजार रूपये व तालुक्याच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यास प्रतिवर्ष 38 हजार रूपये प्रमाणे लाभाचे वितरण केले जाणार आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती (भटक्या जमाती – क धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून) आणि विशेष मागास प्रवर्गातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक संचालक धनश्री भांबुरे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वेरूळ आणि पैठण, आपेगाव तीर्थक्षेत्र विकास आराखड्या बाबत आढावा बैठक

vishwatmaklokswamivarta

लोणार सरोवराच्या विकासकामांना गती द्या !पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश मंत्रालयात अधिकाऱ्यांची घेतली बैठक

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील २५ टन फळे, भाजीपाला विशेष वॅगनने दिल्लीला रवाना जिल्हाधिकाऱ्यांनी कृषि व रेल्वे विभागाचे केले अभिनंदन! – सांगली पॅटर्न – एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण !!

vishwatmaklokswamivarta

सामनगाव–अंतरवाला व सामनगाव–काजळा रस्त्यांची दुरवस्था; तात्काळ दुरुस्तीची मागणी नागरिकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; अपघातांचा धोका वाढला, प्रशासनाने लवकर कारवाईचे आश्वासन

पोलादपूर, महाड, माणगाव तालुका क्रीडा संकुलाच्या कामास गती द्यावी- क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे

जनगणना 2027 साठी फील्ड ट्रेनर प्रशिक्षणास प्रारंभ- निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे