vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

अहमदपूर तालुक्यातील चिलखा येथे अडकलेल्या चार मजुरांची सुखरूप सुटका

अहमदपूर तालुक्यातील चिलखा येथे अडकलेल्या चार मजुरांची सुखरूप सुटका

लातूर, प्रतिनिधी : अतिवृष्टीमुळे अहमदपूर तालुक्यातील चिलखा येथे अडकलेल्या चार मजुरांची आज दुपारी १२:५० वाजता प्रशासनाने सुखरूप सुटका केली. या कार्यात राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी वैयक्तिक लक्ष घालून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

घटनेची माहिती मिळताच सहकार मंत्री श्री. पाटील यांनी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्याशी संपर्क साधून बचाव पथकाला तातडीने घटनास्थळी रवाना केले. स्वतः पावसात चिलखा येथे पोहोचून मा. पाटील यांनी मजूर सुखरूप बाहेर येईपर्यंत घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीवर लक्ष ठेवले.

आज पहाटे ५ वाजेपासून अडकलेल्या मजुरांना प्रशासनाने यशस्वीपणे बाहेर काढले. या कार्यात उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे, तहसीलदार उज्वला पांगरकर, पोलीस निरीक्षक भुसनर यांच्यासह विविध प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

चोंडी – चापडगाव परिसरात तात्पुरता रेड झोन घोषित ड्रोन उडविण्यास सक्त मनाई

सतीश घाटगे यांच्या पाठपुराव्याला यश : चित्रवडगावातील शेतरस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी

वाहनांना हाय सिक्यूरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट आवश्यक…

vishwatmaklokswamivarta

चारचाकी वाहनांना आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांकांसाठीइच्छुकांनी अर्ज सादर करावेत

vishwatmaklokswamivarta

वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालय…

अतनुर गावाजवळील पुलाच्या कामामुळे वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली