vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महिला अत्याचाराची प्रकरणे निकाली काढण्यासाठी गोंदिया, रत्नागिरी, वाशिम येथे विशेष न्यायालये

महिला अत्याचाराची प्रकरणे निकाली काढण्यासाठी गोंदिया, रत्नागिरी, वाशिम येथे विशेष न्यायालये

          राज्य प्रतिनिधी- महिला अत्याचाराची प्रकरणे गतीने निकाली काढण्यासाठी गोंदिया, रत्नागिरी आणि वाशिम येथे विशेष न्यायालये स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

 नव्याने स्थापन करण्यात येणाऱ्या या तीन न्यायालयांसाठी प्रत्येकी ५ नियमित पदे (१ जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, १ लघुलेखक, १ अधीक्षक, १ वरिष्ठ लिपिक, १ कनिष्ठ लिपिक) व प्रत्येकी २ मनुष्यबळ सेवा (१ हवालदार, १ शिपाई) बाह्ययंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्यात महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे त्वरेने निकाली काढण्यासाठी आतापर्यंत २७ ठिकाणी विशेष न्यायालये स्थापन करण्यात आली आहेत. या न्यायालयांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रकरणे निकाली निघाली आहेत. या न्यायालयांची उपयुक्तता विचारात घेता अत्याचारांच्या घटनांमुळे पीडित महिलांना त्वरेने न्याय मिळण्यासाठी गोंदिया, रत्नागिरी आणि वाशिम या ठिकाणी देखील विशेष न्यायालये स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या न्यायालयांसाठी २ कोटी ३९ लाख ७८ हजार रुपयांच्या खर्चाच्या तरतुदीस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

*****

संबंधित पोस्ट

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेत १६ विद्यार्थी व कुटुंबीयांना लाभ मंजूर

स्वच्छ संकल्प अभियानास त्र्यंबकेश्वर येथून प्रारंभ

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या-  योजनेचा लाभ मिळण्याकरिता इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज सादर करावेत 

माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या निधनाने परखड भाष्यकार, कृतीशील विचारवंत हरपला – उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आदरांजली

vishwatmaklokswamivarta

श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला महाराष्ट्राच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा- पर्यटन मंत्री शंभूराज देसाई महोत्सवात स्थानिक लोकपरंपरांचे होणार सादरीकरण..

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान 8 नोव्हेंबर रोजी वाराणसीला भेट देऊन 4 नवीन वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना करणार नवीन वंदे भारत गाड्या प्रवासाचा वेळ वाचवत प्रादेशिक गतिशीलता वाढवून अनेक राज्यांमध्ये पर्यटन आणि व्यापाराला चालना देणार

vishwatmaklokswamivarta