vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या-  योजनेचा लाभ मिळण्याकरिता इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज सादर करावेत 

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या-  योजनेचा लाभ मिळण्याकरिता इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज सादर करावेत

राज्य प्रतिनिधी :- राज्यातील अनुसूचित जातीतील मातंग समाज व त्यातील 12 पोटजाती मांग-मातंग, मिनीमादीग, मादींग, दानखणी मांग, मांगमहाशी, मदारी, राधेमांग, मांग गारोडी, मादगी, मादिगा या पोटजातीतील दारिद्रय रेषेखालील (वार्षिक उत्पन्न मर्यादा रु.300000/-पर्यंत) बेरोजगांराकरीता साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या 50 टक्के अनुदान योजना, बिजभांडवल योजना तसेच थेट कर्ज योजनेच्या लाभाकरिता जिल्ह्यातील इच्छुक लाभार्थ्यांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक रविंद्र धनुर यांनी केले आहे.

जिल्ह्यातील मातंग व समाज व तत्सम 12 पोट जातीतील लोकांना आर्थिक लाभ देण्यासाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी महामंडळाने निश्चित केलेल्या जिल्हानिहाय भौतिक व आर्थिक उ‌द्दिष्टाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. अनुदान योजना, प्रकल्प मर्यादा 0.50 लाख, उद्दिष्ट 40, भौतिक उद्दिष्ट 40.  बीज भांडवल योजना प्रकल्प मर्यादा 7.00 लाख, उद्दिष्ट 30, भौतिक उद्दिष्ट 40.  थेट कर्ज योजना, प्रकल्प मर्यादा 1.00 लाख, उद्दिष्ट 30, भौतिक उद्दिष्ट 30.

दि. 4 नोव्हेंबर 2022 शासन निर्णयान्वये रु. 100000/-प्रकल्प मर्यादेची थेट कर्ज योजना मंजूर करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत रायगड जिल्हयाकरिता 30 चे भौतिक उदि‌ष्ट (50 टक्के पुरुष व 50 टक्के महिला) देण्यात आलेले आहे. यामध्ये ग्रामीण भागासाठी प्राधान्य राहील. तसेच राज्यस्तरावरील क्रिडा पुरस्कार प्राप्त व्यक्तींना तसेच सैन्य दलातील वीरगती प्राप्त वारसापैकी एका सदस्यास प्राधान्याने लाभ देण्यात येईल.

कर्ज प्रकरणासाठी आवश्यक कागदपत्रांचा तपशिल पुढीलप्रमाणे :- अर्जदार महाराष्ट राज्याचा रहीवासी असावा, मातंग समाज व त्यातील 12 पोटजातीतील असावा, अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्ष असावे, अर्जदाराचा सिबील क्रेडीट स्कोअर 500 असावा, अर्जदाराने यापूर्वी महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा, अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न रु. 300000/- यापेक्षा जास्त नसावे, एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस सदर योजनेचा लाभ घेता येईल, व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव / प्रशिक्षित असावा, महामंडळाच्या प्रचलित नियमानुसार व्यवसायास अनुरुप असलेली आवश्यक ती कागदपत्रे/प्रमाणपत्रे/करारपत्रे/ कर्जमागणी अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे.

संबंधित पोस्ट

हरभ-यावरील घाटेअळीचे एकात्मिक व्यवस्थापन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६; तालुकास्तरीय समित्या गठीत

vishwatmaklokswamivarta

रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी करण्याचा राग मनात ठेवून सरपंच पिता पुत्राकडून शिक्षकाला मारहाण!लोखंडी हुकने डोक्यात वार, जिवे मारण्याची दिली धमकी; वरखेडा सिंदखेड येथील घटना…

हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त पूर्वतयारीचा आढावा

इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी, बदनापूर येथे जागतिक फार्मासिस्ट दिन उत्साहात साजरा – औषधनिर्माण क्षेत्रावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

vishwatmaklokswamivarta

माजी खासदार दत्ता मेघे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली श्रद्धांजली जन्मगावी पवनार येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार