vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी, बदनापूर येथे जागतिक फार्मासिस्ट दिन उत्साहात साजरा – औषधनिर्माण क्षेत्रावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी, बदनापूर येथे जागतिक फार्मासिस्ट दिन उत्साहात साजरा – औषधनिर्माण क्षेत्रावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

बदनापूर, (प्रतिनिधी)-इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी, पाथ्रीकर कॅम्पसबदनापूर येथे जागतिक फार्मासिस्ट दिन मोठ्या उत्साहात व औत्सुक्याने साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष डॉ. देवेश पाथ्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. या विशेष दिवशी विद्यार्थ्यांसाठी औषधनिर्माण क्षेत्रातील नवकल्पना आणि संधी याविषयी क्वालिटी अस्सुरान्स मायलन लिमिटेड मॅनेजर नायर यांचे अतिथी व्याख्यान देखील आयोजित करण्यात आले होते. या वर्षीची थीम -थिंक हेल्थ थिंक फार्मसिस्ट ही होती.संस्थेचे अध्यक्ष डॉ. देवेश पाथ्रीकर यांनी उपस्थितांना आजच्या दिवसाचे महत्व समजावून सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने झाली. प्रमुख पाहुणे म्हणून नायर यांनी उपस्थित राहून  विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणातफार्मासिस्टच्या भूमिका, हेल्थकेअर सिस्टममध्ये त्यांचे महत्त्व आणिउद्योजकतेतील संधी यावर सविस्तर चर्चा केली. यावेळी प्राचार्य डॉ. एस.एस जायभाये यांनी विद्यार्थ्यांना फार्मासिस्ट दिनाचे महत्त्व पटवून देतसांगितले की, ‘फार्मासिस्ट केवळ औषध वितरक नसून, ते आरोग्य व्यवस्थेतील

एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहेत.विद्यार्थ्यांनी विविध पोस्टर सादरीकरण, रांगोळी, भाषण स्पर्धा आणिप्रश्नमंजुषा यामध्ये उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वसहभागी आणि विजेत्यांना प्रमाणपत्र व गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यातआले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कल्याण देवकाते, प्रा.मुळे, प्रा.हटकर,प्रा. फोके, प्रा. व्यास,प्रा. डोईफोडे,प्रा. मापारी, प्रा.बोंद्रे, प्रा. राठोड, प्रा. जैस्वाल, तसेच सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.व्यासपीठावर डॉ.पठाण, डॉ. आबेद शेख, डॉ. कडू, प्रा.दिपाली पवार उपस्थित होते.याकार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचलन प्रा. व्यास यांनी केले.

०००००००००००फोटो ओळी…..३९-बदनापूर येथील इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी, पाथ्रीकर कॅम्पस येथे जागतिकफार्मासिस्ट दिन मोठ्या उत्साहात व औत्सुक्याने साजरा करण्यात आला.संस्थेचे अध्यक्ष डॉ. देवेश पाथ्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न

संबंधित पोस्ट

शहापूर येथील पद्मश्री सिंधुताई सपकाळ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत स्वामी विवेकानंद जयंती दिवस ‘राष्ट्रीय युवा दिन’म्हणून साजरा

vishwatmaklokswamivarta

मराठवाडा पाणी प्रश्नाबाबत जलसंवादचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात १० ते २८ फेब्रुवारी दरम्यान हत्तीरोग दूरीकरण मोहीम…

vishwatmaklokswamivarta

ठाण्यात 21 वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू कोरोना पुन्हा एकदा सक्रीय होत असल्याची चिन्हं दिसताच मुंबई महानर पालिका अलर्ट…

मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांच्या प्रयत्नांना यश, पारंपरिक देशी खेळाडूंच्या शासकीय नियुक्त्यांबाबत शासन स्तरावर प्रयत्न होणार.ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव पारंपरिक देशी क्रीडा महाकुंभाच्या उद्घटनात क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांचे आश्वासन

नवी मुंबईच्या विकासाला नवी गती मिळेल ” — महापौर-उपमहापौर निवडीनंतर वनमंत्री गणेश नाईक यांची प्रतिक्रिया

vishwatmaklokswamivarta