vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

बाल निरीक्षण गृहांतील सुरक्षा रक्षकांचे मानधन उपस्थितीच्या पडताळणीनंतरच अदा- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

बाल निरीक्षण गृहांतील सुरक्षा रक्षकांचे मानधन उपस्थितीच्या पडताळणीनंतरच अदा- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, प्रतिनिधी : राज्यातील बाल निरीक्षण गृहांमध्ये सुरक्षा रक्षकांची एकूण २८८ पदे मंजूर असून त्यापैकी २१८ पदांवर कर्मचारी कार्यरत आहेत. या सुरक्षा रक्षकांना शासन निर्णयानुसार प्रतिमाह १८ हजार रुपये मानधन दिले जाते. त्यानुसार दरमहा सुमारे ३९ लाख २४ हजार रुपयांचे मानधन अदा करण्यात येत असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

 

 

 

विधानसभा सदस्य डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी याबाबत प्रश्न विचारला असता, मंत्री तटकरे म्हणाल्या की, सुरक्षा रक्षकांचे मानधन अदा करण्यापूर्वी संबंधित निरीक्षण गृहाच्या अधीक्षकांकडून सुरक्षा रक्षकांच्या उपस्थितीचे प्रमाणपत्र तयार केले जाते. त्यावर जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांची स्वाक्षरी घेऊन ते आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्यात येते. उपस्थितीची खातरजमा झाल्यानंतरच संबंधित सुरक्षा रक्षकांचे मानधन वितरित केले जाते.

सुरक्षा रक्षक हे प्रतिमाह १८ हजार रुपये मानधन दरात उपलब्ध होण्यास किंवा कार्य करण्यास इच्छुक नसल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून बाह्य यंत्रणेमार्फत सुरक्षा सेवा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचेही मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.

0000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोग कार्यालयाच्या नावात बदल• ‘महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग’ या नावाने पत्रव्यवहार करण्याचे आवाहन

नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रात 35 ठिकाणी रविवारी विशेष स्वच्छता, सुशोभिकरण मोहीम..

प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण टप्पा २ अंतर्गत २० लक्ष घरकुल लाभार्थ्यांना मंजूरी पत्राचे वितरण आणि १० लक्ष घरकुल लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचे वितरण  -माजी मंत्री श्री.रावसाहेब पाटील दानवे

vishwatmaklokswamivarta

जालना महानगरपालिका – 372 नळ कनेक्शनचे नियमितीकरण 2715600 रुपये वसुल.

vishwatmaklokswamivarta

प्रवीण टाके छत्रपती संभाजीनगरच्या माहिती उपसंचालक पदावर रूजू

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाच्या ठिकाणी भारताच्या विजयासाठी ‘शतचंडी यज्ञ’ आरंभ