vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

प्रवीण टाके छत्रपती संभाजीनगरच्या माहिती उपसंचालक पदावर रूजू

प्रवीण टाके छत्रपती संभाजीनगरच्या माहिती उपसंचालक पदावर रूजू

 

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे उपसंचालक प्रवीण टाके यांनी सोमवारी छत्रपती संभाजीनगर विभागाचे माहिती उपसंचालक या पदाचा कार्यभार स्वीकारला

प्रवीण टाके यापूर्वी कोल्हापूर येथे उपसंचालक म्हणून कार्यरत होते. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात २००८ ला रुजू झाल्यानंतर त्यांनी नवी दिल्ली येथील महाराष्ट्र परिचय केंद्रात जनसंपर्क अधिकारी म्हणून काम केले आहे. त्यानंतर मुंबई मंत्रालयात वरिष्ठ सहायक संचालक असताना ‘लोकराज्य’चे ते कार्यकारी संपादक होते. चंद्रपूर, नागपूर व नांदेड याठिकाणी त्यांनी जिल्हा माहिती अधिकारी पदावर कार्य केले आहे. शासन सेवेत केलेल्या उल्लेखनीय कामासाठी त्यांना सन २०१९ – २० वर्षाचा यशवंतराव चव्हाण उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे.

पत्रकारितेतील स्नातकोत्तर पदवी प्राप्त असलेले प्रवीण टाके यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा स्व.वसंतराव ओगले पुरस्कार प्राप्त आहे. शासनात येण्यापूर्वी त्यांनी जवळपास १४ वर्ष नागपूर पत्रिका, तरुण भारत, सामना आणि लोकमत वृत्तपत्रात विविध पदावर कार्य केले आहे. त्यांची फकीर ही चरित्र कादंबरी प्रकाशित झाली आहे. वऱ्हाडी भाषेतील स्तंभकार, कवी, लेखक म्हणून त्यांची ओळख असून विविध सामाजिक विषयावर त्यांनी विपुल लेखन केले आहे.

आज विभागीय माहिती कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी येथील जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने अधिकारी,कर्मचा-यांनी त्यांचे स्वागत केले.

*****

संबंधित पोस्ट

सीआयएसएफ’ च्या वतीने वंदे मातरम्’ सुरक्षित तटम समृद्ध भारतम’, सायक्लोथॉन- २०२६ उपक्रम

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून भाग्यश्री सुतार आत्मनिर्भर

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून-रविवारी संयुक्त पुर्व परीक्षेचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

माध्यम व मनोरंजन क्षेत्राची देशात अभूतपूर्व प्रगती – केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल मुरुगन आणि सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते ‘मिफ्फ -२०२६’ चा शुभारंभ

भूमि लोकअदालत दि.१३ रोजी..