vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

सांगली जिल्ह्यात मिशन सुधार, ई-केवायसी अंतर्गत सार्वजनिक वितरण प्रणालीत 83.6 टक्के काम पूर्ण,- वाळवा तालुका ८६.५४ टक्के काम पूर्ण करून अव्वल क्रमांकावर

सांगली जिल्ह्यात मिशन सुधार, ई-केवायसी अंतर्गत सार्वजनिक वितरण प्रणालीत 83.6 टक्के काम पूर्ण,- वाळवा तालुका ८६.५४ टक्के काम पूर्ण करून अव्वल क्रमांकावर

 

 सांगली, प्रतिनिधी) : सार्वजनिक वितरण प्रणाली अधिक पारदर्शक, सदोषरहित आणि गतिमान करण्यासाठी जिल्ह्यात अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन सुधार’ व ई-केवायसी अभियानाला उत्तम यश मिळत असून, दि. २८ सप्टेंबर २०२६ अखेर जिल्ह्यात ई-केवायसीचे ८३.६ टक्के काम पूर्ण झाले आहे. सांगली जिल्ह्यात वाळवा तालुका ८६.५४ टक्के काम पूर्ण करून अव्वल क्रमांकावर असल्याची माहिती प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलके यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

 जिल्हा प्रशासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागामार्फत हे अभियान राबविण्यात येत आहे. तालुकानिहाय ई-केवायसी पूर्णतेची टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे. वाळवा ८६.५४ टक्के, कवठेमहांकाळ ८४.७३ टक्के, मिरज ८४.५८ टक्के, जत ८४.३४ टक्के, विटा-खानापूर ८३.७९ टक्के, सांगली ८२.७५ टक्के, तासगाव ८२.७१ टक्के, पलूस ८२.५१ टक्के, कडेगाव ८३.०६ टक्के, शिराळा ७९.६९ टक्के आणि आटपाडी ७९.२५ टक्के काम पूर्ण झाले आहे.

 ‘मिशन सुधार’ अंतर्गत रास्त भाव दुकाने व शिधापत्रिका व्यवस्थापनाशी संबंधित माहिती शासनाकडून पुरविण्यात आली आहे. यामध्ये Gross Turnover (उलाढाल), Income Group (उत्पन्न गट), Individual as Director (संचालक म्हणून व्यक्ती), PFMS व Postal Services आदी निकषांच्या आधारे पात्र व अपात्र लाभार्थ्यांची पडताळणी करण्यात येत आहे. अपात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना शुभ्र शिधापत्रिकेमध्ये समाविष्ट करण्याचे काम वेगाने सुरू आहे. ‘GIVE IT UP’ अभियानांतर्गत उच्च उत्पन्न गटातील नागरिकांनी अन्न सुरक्षा योजनेतून स्वतःहून नाव कमी करावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.

 जिल्ह्यात सार्वजनिक वितरण प्रणालीचा कारभार अधिक लोकाभिमुख व पारदर्शक करण्यासाठी महसूल व पुरवठा यंत्रणा कटिबद्ध आहे. ज्या तालुक्यांमध्ये काम प्रलंबित आहे, तेथील अधिकाऱ्यांना हे काम जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उर्वरित काम निश्चित मुदतीत पूर्ण करून सांगली जिल्ह्याला १०० टक्के उद्दिष्टपूर्तीकडे नेण्याचे ध्येय पुरवठा विभागाने ठेवले असल्याचे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.

00000

संबंधित पोस्ट

निवडणुकीच्या आदर्श आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही

स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम : शेख महेमूद

उपतालुकाप्रमुख अर्जुन पाटील -ठोंबरे यांच्या संघर्षाला यश;स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच जाफराबाद–छत्रपती संभाजीनगर एसटी सुरू-माहोरा – बरंजळा साबळे – नळणी – जवखेडा ठोंबरे – केदारखेडा – राजूर –तळेगाव – फुलंब्री मार्गावरील हजारो नागरिकांना दिलासा; जवखेडा ठोंबरे नगरीत येथे चालक-वाहकांचा जाहीर सत्कार

पीक-विशिष्ट उत्पादन कृषी योजनांचा जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेत आढावा कृषी योजनांचा जिल्ह्यातील अधिकाधिक शेतक-यांना लाभ द्यावा जिल्हाधिकारी वर्षा मीना

५९ जातींची एकजूट कायम ठेवा’रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर चिखलीत उपवर्गीकरण विरोधी महामोर्चाचा एल्गार

vishwatmaklokswamivarta

वैचारिक दिवाळखोरीकडे चाललेली पिढी समाजासाठी मोठे संकट : मंगल खिवंसरा