vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

प्रत्येक पात्र मतदाराची अचूक नोंद सुनिश्चित करण्यासह ‘एसआयआर’च्या कामाला गती द्यावी मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्या सूचना

प्रत्येक पात्र मतदाराची अचूक नोंद सुनिश्चित करण्यासह ‘एसआयआर’च्या कामाला गती द्यावी

मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्या सूचना…

नाशिक, प्रतिनिधी : मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानाचे काम अधिक गतिमान, अचूक आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करावे. प्रत्येक पात्र मतदाराची नोंद सुनिश्चित करण्यासाठी घराघरांत पोहोचून गणनापत्रके भरून घ्यावीत, स्वयं-नोंदणी प्रक्रियेला चालना द्यावी तसेच नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करावी, अशा सूचना मुख्य निवडणूक अधिकारी तथा महाराष्ट्र राज्याचे अपर मुख्य सचिव एस. चोक्कलिंगम यांनी दिल्या.

मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांनी आज नाशिक शहरातील विविध विधानसभा मतदारसंघांतील मतदान केंद्रांना भेट देऊन मतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानाच्या अंमलबजावणीचा प्रत्यक्ष आढावा घेतला. यावेळी त्यांनी मतदान केंद्रांवरील सुविधा, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांचे कामकाज, गणनापत्रक भरण्याची प्रक्रिया, स्वयं-नोंदणी (सेल्फ एन्युमरेशन) उपक्रम तसेच ईएफ (Enumeration Form) संगणकीकरणाच्या कामाची पाहणी केली. यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांनी मतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण अभियानात वेग, अचूकता आणि पारदर्शकता या तीन बाबींना सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना दिल्या. तसेच स्वयं-नोंदणी प्रक्रियेला अधिक चालना देण्यासाठी व्यापक जनजागृती करावी आणि सर्व पात्र नागरिकांनी गणनापत्रक भरून मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले

यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी डॉ. जयकुमार आढे, सहाय्यक जिल्हाधिकारी कश्मीरा संखे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मधुमती सरदेसाई, १२३-नाशिक पूर्व मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी कुंदन हिरे, १२४-नाशिक मध्य मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी अर्पिता ठुबे, १२५-नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी शुभांगी भारदे, १२६-नाशिकरोड-देवळाली (अ.जा.) मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी शर्मिला भोसले तसेच तहसीलदार राजेंद्र वाकचौरे,अपर तहसीलदार अमोल निकम, तहसीलदार आबासाहेब तांबे, आणि तहसीलदार पंकज पवार उपस्थित होते.मतदारसंघामध्ये केली पाहणी

१२३-नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघातील पार्क साईड बिल्डिंग, बळी मंदिर या परिसरातील मोठ्या मतदारसंख्येच्या सोसायटीमध्ये आयोजित विशेष शिबिराची त्यांनी पाहणी केली. या शिबिरात सुमारे ३० ते ५० नागरिक उपस्थित होते. त्यांच्या गणनापत्रकांची पूर्तता करण्यात आली. तसेच सोसायटीतील मॅपिंग झालेल्या मतदारांची माहिती तपासून, सन २००२ च्या मतदार यादीत नाव उपलब्ध नसलेल्या मतदारांच्या बाबतीत कोणती कार्यवाही करावी, याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

यानंतर त्यांनी १२५-नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील उत्तमनगर (सिडको) येथे घराघरांत सुरू असलेल्या गणनापत्रक भरण्याच्या मोहिमेची पाहणी केली. यावेळी मतदार किरण भालेराव यांच्या घरी भेट देऊन ईएफ फॉर्म भरण्याची प्रक्रिया, स्वयं-नोंदणीची सुविधा आणि मतदारांनी करावयाच्या कार्यवाहीची माहिती दिली.

१२६-नाशिकरोड-देवळाली (अ.जा.) विधानसभा मतदारसंघातील गोवर्धन येथील जिल्हा परिषद शाळेत बीएलओ व बीएलए यांच्याशी त्यांनी संवाद साधला. मतदार यादीतील समान छायाचित्र (फोटो सिमिलर) नोंदींची तातडीने पडताळणी करून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.१२४-नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील वडाळा गाव येथे प्रत्यक्ष मतदारांच्या घरी भेट देऊन गणनापत्रके भरून घेण्याच्या प्रक्रियेची पाहणी केली. कोणताही पात्र मतदार वगळला जाणार नाही, याची दक्षता घेऊन प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

दौऱ्याच्या शेवटी नाशिक तहसील कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असलेल्या ईएफ फॉर्म संगणकीकरणाच्या कामाची त्यांनी पाहणी केली. संगणकीकरणाचे काम वेळेत, अचूक व त्रुटीविरहित पूर्ण करण्याबरोबरच प्रलंबित कामांना गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले.00000

संबंधित पोस्ट

पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेल्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन मनोहर जोशी (मरणोत्तर), पंकज उधास (मरणोत्तर) आणि शेखर कपूर यांना ‘पद्मभूषण’ मिळाल्याबद्दल उपमुख्यमंत्र्यांकडून आनंद व्यक्त

vishwatmaklokswamivarta

समुद्र किनारी समुद्राच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून जाऊन बुडण्याच्या स्थितीत असलेल्या पती-पत्नीचे प्राण  वाचविणाऱ्या रायगड पोलीस दलातील दोन्ही पोलीस अंमलदारांचा मा. पोलीस अधीक्षक रायगड श्रीमती ऑंचल दलाल यांनी प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरव 

नवीन वेळापत्रकानुसार कंपनीने ई-बसेसचा पुरवठा करावा-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश

निवडणूक विभाग / निर्वाचक गणाचे आरक्षण अंतिम, प्रारूप आरक्षणात कोणताही बदल नाही- उपजिल्हाधिकारी राजीव शिंदे- विभागीय आयुक्त यांच्याकडून सर्व 73 आक्षेप नामंजूर 

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र शासनाचे १२ वर्षे मुदतीचे२,००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस..

निरोगी वृद्धत्वासाठी योग’ संकल्पनेवर आधारित आंतरराष्ट्रीय योग दिनात सुमारे ५ हजार नागरिक सहभागी