vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

जिल्हाधिकारी सायकलवरून आले कार्यालयातदिला पर्यावरण संवर्धन व इंधन बचतीचा संदेश

जिल्हाधिकारी सायकलवरून आले कार्यालयातदिला पर्यावरण संवर्धन व इंधन बचतीचा संदेश

 

परभणी, प्रतिनिधी: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी आज स्वतः सायकलवरून कार्यालयात येत पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी आदर्श घालून दिला. त्यांच्या या उपक्रमामुळे पर्यावरण संरक्षण, प्रदूषण नियंत्रण आणि इंधन बचतीचा प्रभावी संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचला.

वाढते प्रदूषण, इंधनाचा वाढता वापर आणि बदलते हवामान या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शक्य तिथे सायकलचा वापर केल्यास इंधन बचतीसोबतच आरोग्य संवर्धनालाही मोठा फायदा होतो, असेही त्यांनी नमूद केले.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण, प्लास्टिकमुक्ती, स्वच्छता आणि नैसर्गिक संसाधनांच्या जतनासाठी प्रत्येकाने सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी चव्हाण यांनी केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात आले.

***

संबंधित पोस्ट

8 मार्च रोजी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम

तांदुळवाडी दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून’प्रत्येकी ५ लाखांची आर्थिक मदत वितरित

सोलापूर येथे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या मुख्य अभियंता कार्यालयाचे उद्घाटन सिंचन योजनांना गती देण्यासाठी सोलापूर कार्यालय ऐतिहासिक पाऊल -जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

केंद्रीय आरोग्य सेवा योजनेच्या दरांमध्ये सुधारणा करणार – केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया

माजी सैनिकांसाठी ‘आपदा मित्र’ प्रशिक्षण; 27 जानेवारीपर्यंत अर्ज मागविले

vishwatmaklokswamivarta

जिल्हा ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ जिल्ह्याला 82 लक्ष रू. चे उद्दिष्ट प्रत्येकाने योगदान देण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta