vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

वरदविनायक महिला स्वयंसहायता समूह बचतगट,भायमाला,कामार्लेयांची ध्येयाकडे वाटचाल

वरदविनायक महिला स्वयंसहायता समूह बचतगट,भायमाला,कामार्लेयांची ध्येयाकडे वाटचाल

विशेष लेख-

अलिबाग तालुक्यातील वरदविनायक महिला स्वयंसहायता समूहाला दि.२७ मार्च २०१८ रोजी रुपये १५ हजारचा फिरता निधी मिळाला. समुहातील प्रत्येक महिलेने २ टक्के व्याजाने निधी वाटून घेतला व त्याची नियमीत परतफेड करुन समुहाला फायदा करुन घेतला. नंतर या समुहाला १ लाखाचे कर्ज मिळाले त्या कर्जाचा वापर समुहातील महिलांनी मसाले, विविध प्रकारचे सरबते करण्यासाठी केला. समुहाच्या अध्यक्ष स्मिता वैद्य यांनी मिनाकारी वर्कचे प्रशिक्षण घेवून समुहातील इतर महिलांनाही त्याचे प्रशिक्षण दिले. त्याप्रमाणे समुहातील महिलांनी मेहनतीने तांब्याच्या वस्तूंवत मिनाकारी शिकून ते विकून स्वतःचा तसेच समूहाचा आर्थिक स्तर उंचावला. समुहाने रायगड सरस २०१७-१८ मध्ये सहभाग घेतला. कोकण सरस २०१९ मध्ये समुहाला व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. तसेच समुहाने महालक्ष्मी सरस २०१७-१८ व २०१८-१९ मध्ये सहभाग नोंदविला आहे.

वरदविनायक महिला स्वयंसहायता समूह बचत गट भायमाला, कामार्ले गटातील एकूण सदस्य संख्या -१० असून यातील दारिद्रय रेषेखालील सदस्य संख्या ७ आहे. तर पी.आय.पी. सदस्य संख्या ३ आहे. गटातील सदस्य बचत दरमहा १०० रुपये असून दर आठवडी बचत २५ रुपये आहे. या समूहाकरिता उपलब्ध बाजारपेठ अलिबाग १० कि.मी., पोयनाड-७ कि.मी. इतके अंतर आहे. जिल्ह्याचे व तालुक्याचे ठिकाण अलिबाग, प्राथमिक आरोग्य केंद्र -पेझारी, गावात शेती- खराब व रब्बी हंगामात, प्रमुख पिक- तांदूळगावातील मुख्य उत्पनाचे स्रोत-शेती, गावातील महिलांचा मुख्य व्यवसाय-शेती मोलमजुरी, गावाच्या विकासाचा मुख्य घटक-अलिबाग-मुंबई महामार्ग, गाव नजदिकच्या बँक- बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, गटाचा व्यवसाय-कॉपर मीना वर्क, मसाले, लोणचे जूस असा आहे.या स्वयंसहायता समूहाने रायगड सरस, कोकण सरस, अति महालक्ष्मी सरस,महालक्ष्मी सरस, घे भरारी EALITY SHOW मध्ये विक्री व प्रदर्शनात सहभाग नोंदवला आहे.

भविष्यातील वाटचाल,वरदविनायक महिला स्वयंसहायता समूह, पुगाव रोहा हा समूह भविष्यात समूहाचे आउटलेट तयार करण्यासाठी प्रयत्नशील आहे. अलिबाग, मुंबई महामार्गाचाही चांगला उपयोग विपणनासाठी करण्याचे नियोजन आहे. यासाठी आम्ही जिल्हा स्तरावरून प्रयत्नशील आहोत .समूहाचा मसाला, जूस, लोणचे, कोकण मसाले सध्या अलिबाग व रायगड जिल्ह्यातील आउटलेट मध्ये सध्या स्वयंसहायता समूहाचे प्रॉडक्ट डिस्ट्रीबुट केले जाते. भविष्यात गटाच्या नावाने उमेद अभियानाचे आउटलेट अलिबाग येथे जिल्हा स्तरावरून चालू करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले व प्रकल्प संचालिका श्रीमती प्रियदर्शनी मोरे यांचे बहुमूल्य असे मार्गदर्शन लाभले.

 मनोज सुमन शिवाजी सानपजिल्हा माहिती अधिकारी रायगड-अलिबाग

 

संबंधित पोस्ट

दुर्गम भागातील वीज वितरण योजनांना गती द्या – जिल्हाधिकारी

vishwatmaklokswamivarta

एसएसबी परीक्षेच्या मोफत प्रशिक्षणासाठी 17 सप्टेंबरला मुलाखती 

vishwatmaklokswamivarta

विधानसभा प्रश्नोत्तर :शासकीय रुग्णालयांमध्ये सिटीस्कॅन आणि एमआरआय-मशीन खरेदीसाठी निधी उपलब्ध करून देणार- उपमुख्यमंत्री अजित पवार वैद्यकीय शिक्षण विभागाकडील खरेदी शासन नियमानुसारच – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

vishwatmaklokswamivarta

इंदू मिल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नियोजित स्मारक जगाला प्रेरणा देणारे ठरेल- विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे इंदू मिल येथील स्मारकाची पाहणी…

राज्यात काही ठिकाणी पाऊस, लातूर, धाराशिव जिल्ह्यात आजही पावसाची शक्यता. पुढील दोन दिवस या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट असल्याने नागरिकांनी व शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे 

पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूलचे शतक महोत्सव व इंग्लिश मीडियम प्रायमरी स्कूल, कोपरीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त वर्षभर विविध उपक्रम राबविले जाणार