vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

रिपब्लिकन पक्षाचे येत्या 16 जून रोजी सिल्वासा येथे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर — केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले* 

रिपब्लिकन पक्षाचे येत्या 16 जून रोजी सिल्वासा येथे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर — केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

मुंबई प्रतिनिधी- रिपब्लिकन पक्षाचे येत्या 16 जून 2026 रोजी सिल्वासा येथे एक दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे. या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेश, ठाणे प्रदेश, पालघर जिल्हा, सिल्वासा, दिव दमन दादरा नगर हवेली, वापी व गुजरात आणि महाराष्ट्रातील प्रमुख कार्यकर्त्यांचे एक दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे. या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत.

सिल्वासा मधील कुडाचा येथील खडीपाडा गावातील फोर स्टोन व्हिलेज रिसॉर्ट येथे 16 जून रोजी सकाळी 11.30 वाजता आयोजित रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात विचारवंत अभ्यासक मंदार भारदे; सहकार क्षेत्रातील तज्ञ सलीम सय्यद आदी विविध क्षेत्रातील तज्ञ मान्यवर रिपब्लिकन कार्यकर्त्यांना या शिबिरात मार्गदर्शन करणार आहेत.

रिपब्लिकन पक्षाच्या या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरास 16 जून 2026 रोजी सकाळी 11:30 वाजता प्रारंभ करण्यात येणार आहे. गुजरात मधील सर्व जिल्ह्यातील कार्यकर्ते, महाराष्ट्रातील प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी तसेच मुंबई, ठाणे, पालघर, दिव दमण, दादरा नगर हवेली, सिल्वासा, वापी, या विभागातील रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात उपस्थित राहण्याचे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

जी.डी.सी.अँड ए व सी.एच.एम. परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 7 मार्च पर्यंत वाढविली

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात 120 उमेदवारांची प्राथमिक निवड  

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ईकेवायसी (EKYC) करून देण्याच्या नावाखाली महिलांची फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आले असून, महिलांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.

महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल जाहीर-आज जाहीर झालेल्या निकालानुसार, 13 लाख 2 हजार 873 विद्यार्थी पास, आजच्या निकालामध्ये कोकण विभाग अव्वल ठरले आहे तर सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा लागला आहे.

vishwatmaklokswamivarta

आशियातील सर्वात मोठे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर महाराष्ट्रात उभारण्यात येणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसएमएमआरडीए आणि ब्रुकफिल्ड कंपनी यांच्या संयुक्त नेतृत्वात प्रकल्प उभारणार*

vishwatmaklokswamivarta

जालन्यात 10 जानेवारी रोजी महा जनआक्रोश मोर्चाचे आयोजन-संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मराठा आंदोलकांची मागणी…