vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल जाहीर-आज जाहीर झालेल्या निकालानुसार, 13 लाख 2 हजार 873 विद्यार्थी पास, आजच्या निकालामध्ये कोकण विभाग अव्वल ठरले आहे तर सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा लागला आहे.

महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल जाहीर:-आज जाहीर झालेल्या निकालानुसार, 13 लाख 2 हजार 873 विद्यार्थी पास, आजच्या निकालामध्ये कोकण विभाग अव्वल ठरले आहे तर सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा लागला आहे.

 

राज्य प्रतिनिधी- महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल जाहीर- आज जाहीर झालेल्या निकालानुसार, 13 लाख 2 हजार 873 विद्यार्थी पास झाले आहेत. आजच्या निकालामध्ये कोकण विभाग अव्वल ठरले आहे तर सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा लागला आहे.

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडून आज (5 मे) बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. आता दुपारी 1 वाजल्यापासून विद्यार्थ्यांना त्यांचे बारावी बोर्ड परीक्षेचे गुण results.digilocker.gov.in, mahahsscboard.in, hscresult.mkcl.org या बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट्स सोबतच अन्य थर्ड पार्टी वेबसाईट्स वरही पाहता येणार आहेत. हा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना आईचं नाव आणि रोल नंबर टाकावा लागेल. त्यानंतर काही क्षणात तुमचा निकाल स्क्रिनवर दिसणार आहे. आज सकाळी बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, राज्याचा बारावी परीक्षेचा बोर्डाचा निकाल 91.88% लागला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत हा निकाल 1.49% कमी आहे. यंदाची मुलींनी बारावीच्या निकालामध्ये बाजी मारली आहे. सुमारे 5% अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. आज ऑनलाईन निकालानंतर उद्या पासून शाळा, कॉलेजात गुणपत्रिकांचे वाटप सुरू होणार आहे.

 कसा पहाल बारावीचा निकाल ऑनलाईन?बोर्डाच्या अधिकृत बेवसाइटवर जा.-होमपेजवर ‘महाराष्ट्र एचएससी निकाल २०२५’ लिंक दिसेल. त्या लिंकवर क्लिक करा.क्लिक करताच नवीन विंडो उघडेल. त्याठिकाणी सीट नंबर टाका नंतर आईचे नाव टाका.

सबमिट’ बटणावर क्लिक करा.यानंतर तुमचा रिझर्ट स्क्रीनवर दिसेल.हा रिझर्ट डाऊनलोड करून ठेवा.

 मोबाईल वर SMS द्वारा कसा पहाल?

SMS द्वारा निकाल पाहण्यासाठी MHHSC{SPACE} Seat Number तुम्हांला 57766 वर पाठवावा लागेल.आता तुम्ही ज्या नंबर वरून मेसेज पाठवला आहे त्या नंबर वर निकाल एसएमएस च्या माध्यमातून कळवला जाईल.पुणे, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, कोकण, छत्रपती संभाजी नगर, लातूर या 9 विभागातून एकूण 14 लाख 27 हजार 85 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यातून 14 लाख 17 हजार 969 विद्यार्थी प्रविष्ट झाले. आज जाहीर झालेल्या निकालानुसार, 13 लाख 2 हजार 873 विद्यार्थी पास झाले आहेत. आजच्या निकालामध्ये कोकण विभाग अव्वल ठरले आहे तर सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा लागला आहे.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिन राज ठाकरे काय म्हणाले ते पहा सोशल मीडिया अकाउंट एक्स वरील संबोधन

राज्यात अतिवृष्टी, सर्व यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळ बैठकीत परिस्थितीचा आढावा, नुकसानीचे तातडीने पंचनामे

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय योग दिन होणार साजरा

vishwatmaklokswamivarta

महापालिकेच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या फिश मार्केटच्या वास्तूचे काम गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावे. हे फिश मार्केट सर्व सोयीसुविधांनीयुक्त होण्यावर प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींनी भर द्यावा, असे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे-फिश मार्केटच्या वास्तूचे भूमिपूजन संपन्न

vishwatmaklokswamivarta

शोक संवेदना**भारतीय सांगीतिक संस्कृतीचा एक अमूल्य वारसा काळाच्या पडद्याआड*-पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई*पद्मविभूषण आशा भोसले यांच्यासाठी मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून शोक संवेदना*

पुण्यातून मोठी बातमी पुणे एटीएसची मोठी कारवाई; पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील ६६ जणांची चौकशी.