vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

लातूर येथील सीआरपीएफ रंगरूट प्रशिक्षण केंद्रात 2 हजार रोपांचे वृक्षारोपण

लातूर येथील सीआरपीएफ रंगरूट प्रशिक्षण केंद्रात 2 हजार रोपांचे वृक्षारोपण

लातूर- प्रतिनिधी: येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ)रंगरूट प्रशिक्षण केंद्रात पोलीस उपमहानिरीक्षक तथा प्राचार्य अमीरुल हसन अंसारीयांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. याउपक्रमाअंतर्गत सुमारे 2 हजार रोपांची लागवड करण्यात आली

लागवड करण्यात आलेल्या रोपांमध्ये स्थानिक प्रजातींची फळझाडे, सावली देणारी वृक्षतसेच औषधी वनस्पतींचा समावेश होता.यावेळी उपस्थित अधिकारी आणि जवान प्रशिक्षार्थींना मार्गदर्शनकरताना अमीरुल हसन अंसारी म्हणाले, “आपण केवळ राष्ट्राच्या सुरक्षेसाठीच नव्हे, तर पर्यावरणाच्यासंरक्षणासाठीही कटिबद्ध आहोत. आज लावलेली झाडे भविष्यातील पिढ्यांसाठी अमूल्य ठेवा ठरतील.”

या कार्यक्रमाला कमांडंट पारसनाथ, राजपत्रित अधिकारी, जवान तसेच सुमारे 1 हजार 700प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. यावेळी सर्वांनी पर्यावरण संवर्धनासाठी सातत्यानेवृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करण्याची शपथ घेतली.यापूर्वीही सीआरपीएफ आरटीसी, लातूरतर्फे कॅम्प परिसर आणिआजूबाजूच्या भागात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले आहे. त्यामुळे हा परिसरविविध पक्षी व वन्यजीवांसाठी सुरक्षित अधिवास म्हणून विकसित होत असल्याचे यावेळीसांगण्यात आले.****

संबंधित पोस्ट

भाजपा जालना शहराच्या वतीने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन, वृक्षारोपण व जिल्हा कार्यकर्ता संमेलनाचे आयोजनमोठ्या संख्येने उपस्थित राहावे – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

उद्योगांना आवश्यक कौशल्यधारक मनुष्यबळ उपलब्धतेसाठीशासन कटिबद्ध- कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा

एमएचटी-सीईटी-परिक्षा केंद्र व त्या सभोवतालच्या १०० मीटर परिसरात,भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ मधील तरतूदी लागू..

रेल्वे स्टेशन जामा मशीद येथे दावत – ए- इफ्तारचा.पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसह समाजातील सर्व स्तरातील नागरिकांनी उपस्थिती.

शंभर शिक्षक क्लब ऑफ जालना तर्फे सामाजिक कार्याचा गौरव म्हणून राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित…

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेत १०० टक्के उद्दिष्टपूर्तीप्रमुख बँक अधिकारी व शाखा व्यवस्थापकांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव