vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

एमएचटी-सीईटी-परिक्षा केंद्र व त्या सभोवतालच्या १०० मीटर परिसरात,भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ मधील तरतूदी लागू..

एमएचटी-सीईटी-परिक्षा केंद्र व त्या सभोवतालच्या १०० मीटर परिसरात,भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ मधील तरतूदी लागू..

        सातारा, प्रतिनिधी- एमएचटी-सीईटी सामाईक प्रवेश परीक्षा २०२५ PCM ग्रुप ची दिनांक २७ एप्रिल २०२५ रोजी सकाळ सत्रात घेण्यात आलेल्या व परिक्षेकरीता उपस्थित राहिलेल्या उमेदवारांची फेरपरिक्षा दिनांक ०५ मे २०२५ रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत घेण्यात येणार आहे.

दिनांक ०५ मे २०२५ रोजी PCM ग्रुपची परीक्षा सातारा जिल्ह्यातील १) यशोदा टेक्निकल कॅम्पस, सर्वे न. २४२/१, वाढे फाटा, ता. जि. सातारा, २) कै. डॉ. दादासाहेब चव्हाण मेमोरियल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, मसूर, ता. कराड, जि. सातारा, ३) अरविंद गवळी कॉलेज ऑफ इंजिनिअरोग, पानमाळेवाडी, पो.-वर्ये, ता. जि. सातारा, ४) डॉ. अशोक गुजर टेक्निकल इन्स्टिट्यूट, डॉ. दौलतराव अहेर कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, विद्यानगर, ता. कराड, जि. सातारा, ५) शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड, मसूर रोड, सैदापूर, कराड, यावरील पाच ठिकाणच्या परिक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे.

आणि, ज्या अर्थी, नमुद केलेल्या परिक्षा केंद्राच्या परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी उक्त नमुद केलेल्या परिक्षा केंद्राचे परिसरात व त्या सभोवतालच्या १०० मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ मधील तरतूदी लागू करणे आवश्यक झाले आहे, अशी माझी खात्री आली आहे.

 त्याअर्थी मी नागेश पाटील, अपर जिल्हादंडाधिकारी, सातारा भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ मधील तरतूदीनुसार मला असलेल्या अधिकारान्वये दिनांक ०५ मे २०२५ रोजी सकाळी ०७.०० ते दुपारी ०५.३० वाजेपर्यंत या कालावधीत सातारा जिल्ह्यातील उपरोक्त नमुद केलेल्या परिक्षा केंद्राचे परिसरात व त्या सभोवतालचे १०० मीटर परिसरात परिक्षार्थी, परिक्षेसाठी नेमलेले अधिकारी- कर्मचारी, सुरक्षा अधिकारी -कर्मचारी यांना वगळून इतर व्यक्तींना प्रवेश करण्यास या आदेशान्वये मनाई करीत आहे. तसेच दोन वा दोन पेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करीत आहे. तसेच विद्यालय – महाविद्यालयाचे परिसरातील सार्वजनिक टेलिफोन,एस. टी.डी. बुथ,आय. एस. डी. बुथ,फॅक्स केंद्रावर मोबाईल, वायरलेस सेट, ट्रॅांझिस्टर, रेडिओ, कॅल्क्युलेटर, लॅपटॉप परिक्षा केंद्राच्या १०० मीटर पर्यंत परिसरात वापरणेस व जवळ बाळगणेस, तसेच परिक्षा केंद्रात नेणेस मनाई करीत आहे.

सदरचा आदेश दि ०५ मे २०२५ रोजी सकाळी ०७.०० ते दुपारी ०५.३० वाजेपर्यंत या कालावधीत अंमलात राहील.

0000

संबंधित पोस्ट

शिर्डी येथे ‘आंतरराष्ट्रीय सहकार परिषद २०२५’चे उद्घाटन सहकारी संस्था पारदर्शकपणे चालवल्यास सहकार क्षेत्राची भरभराट – हरिभाऊ बागडे

vishwatmaklokswamivarta

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेची विशेष सुविधा

आताची मोठी बातमी -बीड जिल्ह्याचे चे सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी हत्याप्रकरणी पैठणमध्ये आक्रोश मोर्चा चे आयोजन

महाराष्ट्र, राजस्थान, गोवा, पंजाब, गुजरात, मणीपुर मधील 300 कलावंत-सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकर वारसा सह्याद्रीचा एम.आय.टी. महाविद्यालय, छत्रपती संभाजी नगर, येथे होणार भव्य सांस्कृतिक कार्यक्रम,पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपूर व सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणार सांस्कृतिक कार्यक्रम…

अयोध्या नगर येथे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या हस्ते महाआरती

सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्यात यावी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,पणन विभागाच्या १०० दिवसांच्या आराखड्याचा आढावा

vishwatmaklokswamivarta