vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

संविधान दिनानिमित्त रॅली उत्साहात संपन्न

संविधान दिनानिमित्त रॅली उत्साहात संपन्न

 

 सांगली, प्रतिनिधी: भारतीय संविधानास 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त “घर घर संविधान” हा उपक्रम साजरा केला जात आहे. या उपक्रमाचे औचित्य साधून भारतीय संविधानाची महती जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी काढलेली रॅली उत्साहात संपन्न झाली. यानिमित्त जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, एस.टी. स्टॅन्ड, परिसर, सांगली येथे संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. त्यानंतर भारतीय संविधानाप्रती सर्वसामान्य नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, एस.टी. स्टँड परिसर सांगली मार्गापासून – छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे- महानगरपालिका इमारत – सिटी पोस्ट ऑफिस मार्गे स्टेशन चौक सांगली या मार्गावर संविधान रॅली काढण्यात आली. ही रॅली उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आली. रॅलीमध्ये समाज कल्याण विभागाकडील योजनांची माहिती देण्यासाठी समता रथ फिरविण्यात आला. रॅलीची सांगता स्टेशन चौक सांगली येथे झाली

 यावेळी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण बाळासाहेब कामत, समाज कल्याण विभागाचे अधिक्षक प्रशांत मोहिते यांच्यासह समाज कल्याण, दिव्यांग कल्याण, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, विविध महामंडळे इ. शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी, जिल्ह्यातील विविध मान्यवर व्यक्ती, तसेच पटवर्धन हायस्कूल सांगली, सिटी हायस्कूल सांगली, आरवाडे हायस्कूल सांगली, राणी सरस्वती कन्या शाळा सांगली व कै. ग. रा. पुरोहित कन्या प्रशाला सांगली या शाळांमधील 200 विद्यार्थी व शिक्षकांनी आपला सक्रिय सहभाग नोंदविला.

 संविधान दिनानिमित्त सर्वसामान्य नागरिकांनाही भारतीय संविधानातील स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता या मुल्यांबद्दल जागरूकता निर्माण व्हावी, याकामी सामाजिक न्याय विभाग व बार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली आगार येथे संविधान उद्देशिका जागरूकता मोहीम घेण्यात आली, ज्यामध्ये या कार्यालयाचे समतादूत यांनी संविधान उद्देशिका प्रतींचे प्रवाशांना व आगार व्यवस्थापकांना वाटप करून उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. सदर उद्देशिका वाचनामध्ये रा. प. सांगली आगाराच्या आगार व्यवस्थापक शीतल माने, सहाय्यक वाहतूक अधिक्षक महेश पाटील, यांच्यासह आगारातील कर्मचारी यांनी प्रवाशांसह सहभाग नोंदवला.

00000

संबंधित पोस्ट

खर्डा गावातील मदारी वसाहतींचे काम मार्च अखेरपर्यंत पूर्ण करावे- विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रात मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहिम

दिवाळीत आकाशकंदील उडविण्यावर बंदी 

vishwatmaklokswamivarta

पारसी टेकडी पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करणार          -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल,केशवसृष्टी इरकॉन घनवनचे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण…

vishwatmaklokswamivarta

सांस्कृतिक कार्यक्रमांनी महिला गौरव सप्ताहाची सांगता-सकारात्मकता निर्माण करा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला मैला शुद्धीकरण केंद्रासाठी चिखली येथील जागा