vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

खर्डा गावातील मदारी वसाहतींचे काम मार्च अखेरपर्यंत पूर्ण करावे- विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

खर्डा गावातील मदारी वसाहतींचे काम मार्च अखेरपर्यंत पूर्ण करावे- विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे

मुंबई, प्रतिनिधी: यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत जामखेड तालुक्यातील खर्डा गावात २० मुस्लीम मदारी कुटुंबियांच्या वसाहतीसाठी निधीस मंजूरी देण्यात आली. ३१ मार्च पर्यंत या कामाला गती देऊन वसाहतीचे काम पूर्ण करावे, असे निर्देश विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिले.

विधानपरिषद येथे मौजे खर्डा (ता. जामखेड) अहिल्यानगर जिल्ह्यातील यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत मदारी वसाहतीच्या कामासंदर्भात आढावा घेण्यात आला. त्यावेळी सभापती प्रा. राम शिंदे बोलत होते. यावेळी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, इतर मागासवर्ग कल्याण विभागाचे संचालक ज्ञानेश्वर खिल्लारी, प्रादेशिक उपसंचालक भगवान वीर, सहाय्यक संचालक विनोद लोंढे, खर्डा ग्रामपंचायतीच्या सरपंच संजीवनी पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वैजीनाथ पाटील, माजी सभापती रवींद्र सुरवसे, ग्रामपंचायत सदस्य गणेश शिंदे, महालिंग कोरे, महेश दिंडोरे व खर्डा येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

  सभापती प्रा. राम शिंदे म्हणाले की, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत जामखेड तालुक्यातील खर्डा गावात २० मुस्लीम मदारी कुटुंबियासाठी वसाहतीसाठी २०१८ ला निधीचे वितरण करण्यात आले. हे काम तात्काळ पूर्ण करण्यासाठी नव्याने निविदा प्रकिया राबवून, स्वयंसेवी संस्थांची मदत घेऊन पूर्ण करावे.

मदारी वसाहतीचे काम हा राज्यातील पहिला प्रकल्प आहे. त्यामुळे या वसाहतीचे काम उत्कृष्ट व गुणवत्तापूर्ण करावे. तसेच वसाहतीच्या ठिकाणी तेथील नागरिकांना आवश्यक सुविधा देखील उपलब्ध करून द्याव्यात, अशी सूचनाही सभापती प्रा. शिंदे यांनी केली.

0000

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर· उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय· मंत्री व अधिकाऱ्यांचे विदेश दौरे रद्द· अत्यावश्यक सोडून विशेष विमान, हेलिकॉप्टर दौरे नको· बहुतेक बैठका व्हीसीद्वारे करण्याचे निर्देश· मंत्री व अधिकाऱ्यांनी किमान एक दिवस सार्वजनिक वाहतूक वापरण्याचे निर्देश..

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विशेष लेख-माझा मराठाचि बोलु कौतुकें’

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रयत्नशील – कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे राज्यातील २४ जिल्हे व १०३ तालुके अवकाळीने बाधित; कृषिमंत्र्यांकडून पाहणी

केंद्र सरकारकडून राज्यांना १ लाख ९ हजार कोटींचे कर वितरण; महाराष्ट्राला ७ हजार २२ कोटींचा अतिरिक्त निधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रथयात्रेनिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या.

महिलांचा देशाच्या प्रगतीत व नवीन पिढी घडवण्यात, त्यांच्यापुढे आदर्शठेवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा : डॉ. देवेश पाथ्रीकर