vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासन वाऱ्यावर सोडणार नाही- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची ग्वाही• शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यास शासन कटिबद्ध• सोनखेड व लोहा येथे पीक परिस्थितीची केली पाहणी• पिण्याचे पाणी, चारा व शिक्षणासाठीही मदत देणार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शासन वाऱ्यावर सोडणार नाही- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची ग्वाही• शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यास शासन कटिबद्ध• सोनखेड व लोहा येथे पीक परिस्थितीची केली पाहणी• पिण्याचे पाणी, चारा व शिक्षणासाठीही मदत देणार

            नांदेड ( प्रतिनिधी : पावसाचा खंड पडल्यामुळे राज्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, शासनाने या परिस्थितीची गंभीर दखल घेतली आहे. प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. पंचनामे व पाहणीनुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल. शेतकऱ्यांना शासन वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज येथे दिली.

  उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज नांदेड जिल्ह्यातील सोनखेड व लोहा येथे पीक परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार विक्रम काळे, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार आनंद तिडके-बोंढारकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, उपविभागीय अधिकारी विलास नरवटे, तहसीलदार विठ्ठल परळीकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

    पावसाअभावी शेतीतील पिके करपून गेली असून, शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. मी मराठवाड्याचीच लेक असून, मराठवाड्यातील दुष्काळाची परिस्थिती चांगल्या प्रकारे जाणते. शेतकऱ्यांच्या भावनांची शासनाने गंभीर दखल घेतली आहे. प्रशासनाला प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्या शेतकऱ्यांचे ज्या प्रकारे नुकसान झाले आहे, त्यांना त्यानुसार मदत देण्यात येईल. सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार असल्याचेही उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी सांगितले.

  दुष्काळी परिस्थितीत शेतकरी कुटुंबांना पिण्याचे पाणी, जनावरांसाठी पिण्याचे पाणी, चारा तसेच मुलांच्या शिक्षणासाठी शासन आवश्यक मदत करणार आहे. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

    यावेळी उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांनी शेतकरी व महिला शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या. राज्य शासन या संकटात पूर्णपणे तुमच्यासोबत आहे. सर्वतोपरी मदत केली जाईल, असा धीर देत दिलासा दिला.     यावेळी परिसरातील शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भारतीय नौदलाने #INS_Satavahana येथे समुद्राच्या तळाशी विशेष योग सत्र आयोजित करून एक अनोखा उपक्रम राबवला.

प्राथमिक शिक्षणाचा पाया भक्कम करून गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावे – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील १४ शिक्षक आणि २ केंद्रप्रमुखांचा गौरव

vishwatmaklokswamivarta

नायगाव बुद्रुक जिल्हा परिषद शाळेत सिरसाठ दाम्पत्याकडून शैक्षणिक साहित्याचे वाटप**’पे बॅक टू सोसायटी’ भावनेतून सामाजिक बांधिलकी; विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण*

राज्य राखीव पोलीस बल शिपाई भरतीची लेखी परीक्षा 17 मे रोजी…

रोममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली इटलीचे राष्ट्राध्यक्ष सर्जिओ मॅटारेला आणि पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट,भारत-इटली संबंधांची वाढती व्याप्ती आणि महत्त्व अधोरेखित अनेक महत्त्वपूर्ण करार यावेळी आदान-प्रदान करण्यात आले.

दिव्यांग लाभार्थ्यांच्या मानधनात हजार रुपयांची वाढ; 20 मार्चपूर्वी युडीआयडी आणि आधार अपडेट करण्याचे आवाहन