vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

दहा दिवसांत २९ लाख ७७ हजार ६७० भाविकांची केली आरोग्य तपासणी‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमाला राज्यभर उत्स्फूर्त प्रतिसाद; ५३ हजार शिबिरांचे आयोजन

दहा दिवसांत २९ लाख ७७ हजार ६७० भाविकांची केली आरोग्य तपासणी‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमाला राज्यभर उत्स्फूर्त प्रतिसाद; ५३ हजार शिबिरांचे आयोजन

            मुंबई, प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना त्यांच्या परिसरातच मोफत आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रम राबविण्यात आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमातून राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये ५३ हजार ८६२ आरोग्य शिबिरे घेण्यात आली. या शिबिरांमध्ये दहा दिवसांत सुमारे २९ लाख ७७ हजार ६७० भाविकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

            मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने सार्वजनिक आरोग्य विभाग, शासकीय व निमशासकीय यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्थांची आरोग्य यंत्रणा, सार्वजनिक गणेश मंडळे आणि सामाजिक संस्थांचे सहकार्य आणि लोकसहभागातून हा उपक्रम राबविण्यात आला. सार्वजनिक गणेश मंडळांच्या मंडपांपासून महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत तसेच ग्रामीण भागात आरोग्य शिबिरे घेण्यात आली. त्यामुळे भाविकांना घराजवळच प्राथमिक आरोग्य तपासणीची सुविधा मिळाली.

 

            भाविकांना आरोग्य तपासणीसाठी दूर जावे लागू नये आणि आजारांचे वेळेत निदान व्हावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. शिबिरांमध्ये हृदयरोग, किडनीविकार, कर्करोग, मधुमेह, संसर्गजन्य आजार, मेंदूचे गंभीर आजार, बालरोग यांसह विविध आजारांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. आरोग्यविषयक समस्या आढळलेल्या भाविकांना पुढील तपासणी व उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टर तसेच संबंधित रुग्णालयांकडे पाठविण्यात आले

            शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा रुग्णालये, शहरी आरोग्य यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्थांची आरोग्य यंत्रणा तसेच धर्मादाय रुग्णालयांतील डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांचे सहकार्य या उपक्रमाला मिळाले. पुढील उपचारांची गरज असलेल्या पात्र रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजना तसेच इतर संबंधित शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.विभागनिहाय आकडेवारी    विदर्भात ९ हजार ८३४ शिबिरांमध्ये ५ लाख ९४ हजार ६३६ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. मराठवाड्यात ७ हजार ६३१ शिबिरांमध्ये ४ लाख ५६ हजार ८६३, ठाणे-पालघर भागात ६ हजार १७ शिबिरांमध्ये ३ लाख १७०, कोकणात ३ हजार २४९ शिबिरांमध्ये १ लाख ३७ हजार १४८, उत्तर महाराष्ट्रात ५ हजार ८३८ शिबिरांमध्ये २ लाख ८८ हजार ९४०, तर पश्चिम महाराष्ट्रात १२ हजार ४२४ शिबिरांमध्ये ७ लाख ६६ हजार ७६२ भाविकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तर, पुढील उपचारासाठी पाठविण्यात आलेले संदर्भित रुग्ण ५ हजार ९९३ आहेत.सलग दुसऱ्या वर्षी ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद      मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमाला यंदा दुसऱ्या वर्षी राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गणेशोत्सवाच्या काळात भाविकांना त्यांच्या परिसरातच मोफत आरोग्य तपासणीची सुविधा देण्यात आली. ३६ जिल्ह्यांमध्ये ५३ हजारांहून अधिक शिबिरांत सुमारे २९ लाखांपेक्षा अधिक नागरिकांची तपासणी झाली. आरोग्यविषयक समस्या आढळलेल्या नागरिकांना पुढील तपासणी व उपचारासाठी योग्य ठिकाणी पाठविण्यात आले. विविध यंत्रणा, गणेश मंडळे, सामाजिक संस्था आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबविता आला, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली.

000

संबंधित पोस्ट

मुंबई-पुणे-द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करा; मिसिंग लिंकचे कामही लवकरात लवकर पूर्ण करा – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

यूपीएससी पूर्व परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांसाठी अमृतची विशेष अर्थसहाय्य योजना; पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविले

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि कलावैभवाचा हरियाणात 4 आणि 5 जून रोजी अविष्कार

जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी जलसंधारण कामावरील बांबू बेटाची केली पाहणी*

उद्योजकांच्या पंखाना शासन बळ देणार -पालकमंत्री संजय शिरसाट जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत १२ हजार कोटींचे सामंजस्य करार, २१ हजार रोजगार निर्मिती

जिल्ह्यातील 44 नागरिक आखाती देशात