vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्ह्याच्या सर्वागिण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

जिल्ह्याच्या सर्वागिण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

बुलडाणा, प्रतिनिधी : राज्यातील सर्व जिल्ह्यांचा समतोल विकास साधण्यासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून दिला जात आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. विकासकामांसाठी शासन आवश्यक ते सर्व सहकार्य करेल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. मकरंद पाटील उपस्थित होते.

खामगाव दौऱ्यात उपमुख्यमंत्री ना. पवार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना जिल्ह्यातील विविध विकास प्रकल्पांचा व प्रलंबित कामांची माहिती घेतली. त्यांनी पुढे सांगितले की, ग्रामीण रस्ते, सिंचन सुविधा, आरोग्य सेवा, शिक्षण व इतर पायाभूत सुविधांसाठी राज्य सरकारकडून विशेष निधीची तरतूद केली जाईल. जिल्ह्यातील मागास भागांचा सर्वांगीण विकास, शेतकऱ्यांचे सक्षमीकरण आणि युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण करणे, हे आमचे प्राधान्य आहे, असेही त्यांनी नमूद केले.

       राज्याचा आर्थिक विकास समतोल होण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये सर्व विभागासाठी निधीची तरतुद करण्यात आली आहे. लाडकी बहिण व लाडका भाऊ योजनासाठी विशेष तरतुद करण्यात आली असून लाभार्थ्यांना लाभ दिल्या जात आहे. सोबतच इतर विभागावर निधीची कमतरता भासू देणार नाही,याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. अनुसूचित जाती, जमाती व आदिवासी योजनासाठी गेल्या वर्षापेक्षा जास्त तरतूद केली असून सर्वसमावेशक विकास साध्य करण्याचा शासनाचा मानस असल्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी व्यक्त केला.

000000

संबंधित पोस्ट

हिंदूंमधील शौर्य व सामर्थ्य वाढवण्यासाठीच गदापूजन !- डॉ. उदय धुरी, प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती-रामराज्याच्या स्थापनेसाठी श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने देशभरात ५०० ठिकाणी,तर मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांतही ५० हून अधिक ठिकाणी सामूहिक गदापूजनाचा कार्यक्रम !

सामाजिक न्याय दिनाच्या पूर्वसंध्येला नवी मुंबई महानगरपालिका भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि मुंबई विद्यापीठ यांच्यामध्ये स्मारकात पदविका अभ्यासक्रम सुरू करण्याचा सामंजस्य करार*

एसटी महामंडळातील सर्व बसेस २०३५ पर्यंत ई-बसेसमध्ये रूपांतरित करण्याच्या दृष्टीने राज्य शासन आणि एसटी महामंडळाकडून वेगाने प्रयत्न सुरू आहेत. या अनुषंगाने आवश्यक असलेल्या चार्जिंग सुविधांची उभारणी करण्यासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर राज्यभरात किमान २०० चार्जिंग स्टेशन उभारण्यात – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक –

पुणे सार्वजनिक सभे’कडून अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांना ‘सार्वजनिक काका पुरस्कार’ प्रदान !* 

पिंपळवंडी बालिका अत्याचार व हत्या प्रकरण खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे विनंती करणार- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

महादेवा’ योजनेअंतर्गत जिल्हास्तर फुटबॉल निवड चाचणी;निवडलेल्या खेळाडूंना लिओनेल मेस्सीसमवेत खेळण्याची संधी..

vishwatmaklokswamivarta