vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राज्यात काल सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक ७१ मिलीमीटर पाऊस…

राज्यात काल सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक ७१ मिलीमीटर पाऊस…

मुंबई, प्रतिनिधी : राज्यात मागील २४ तासांमध्ये (१३ जून रोजी सकाळपर्यंत ) सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक ७१ मिमी पाऊस झाला आहे. तर कोल्हापूर ३९.८ मिमी, रत्नागिरी जिल्ह्यात ३७ मिमी, सांगली जिल्ह्यात ३६ मिमी आणि नाशिक जिल्ह्यात २५.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात कालपासून आज १३ जून २०२५ रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) :- ठाणे १०.५, रायगड १५, रत्नागिरी ३७, सिंधुदुर्ग ७१, पालघर २२.२, नाशिक २५.२, धुळे २१.४, नंदुरबार ३.१, जळगाव ९.३, अहिल्यानगर १८.६, पुणे २०.१, सोलापूर १५.७, सातारा २४.२, सांगली ३६.६, कोल्हापूर ३९.८, छत्रपती संभाजीनगर २०.६, जालना २३.६, बीड १०.६, लातूर ६.३, धाराशिव ९.६, नांदेड ४.९, परभणी ८.९, हिंगोली १९.३, बुलढाणा १३.९,

अकोला ८.७, वाशिम १६.७, अमरावती ३.५, यवतमाळ ४.१, वर्धा ३.९., नागपूर ०.३, भंडारा ०.१, गोंदिया ०.१, चंद्रपूर २.६ आणि गडचिरोली १.४.

अतिवृष्टी आणि संभाव्य पूर परिस्थिती बाबत उपाय योजना म्हणून एनडीआरएफ, एसडीआरएफ पथकांना आपत्कालीन परिस्थितीकरिता सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

राज्यात अहिल्यानगर जिल्ह्यात झाड पडून एक व्यक्ती मृत व एक व्यक्ती जखमी झाली आहे. वीज पडून सांगली जिल्ह्यात दोन व्यक्ती मृत, जालना जिल्ह्यात वीज पडून एक व्यक्ती व १२ प्राणी मृत तर एक व्यक्ती जखमी, यवतमाळ जिल्ह्यात वीज पडून दोन व्यक्ती जखमी, वाशिम जिल्ह्यात वीज पडून एक व्यक्ती व चार प्राणी मृत आणि एक व्यक्ती जखमी झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यात वीज पडून १७ प्राणी जखमी झाले आहेत. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे. तर दिनांक १२ मार्च रोजी अहमदाबाद ते लंडन जाणाऱ्या एअर इंडियाच्या AI १७१ या विमानच्या अपघातात राज्यातील दहा प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.

००००

संबंधित पोस्ट

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी स्टुडंट ऑफ रोड सेफ्टी अभियान उपयुक्त – आदिती तटकरे यांचे आवाहन,मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते सुरक्षा गुणांकन प्राप्त 28 शाळेतील विद्यार्थी, शिक्षकांचा गौरव

vishwatmaklokswamivarta

सामूहिक तेलबिया पीक प्रात्यक्षिकांतर्गत शेतकरी प्रशिक्षण व शेती शाळा संपन्न नागापूर येथे सोयाबीन व्यवस्थापनावर मार्गदर्शन; प्रक्षेत्र भेटीतून शेतकऱ्यांच्या समस्यांचे निरसन

सक्षम मानव संसाधनातून विकसित भारताचे स्वप्न साकारणार -पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे· महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा संघटनेचा मेळावा संपन्न· गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थीनींचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार· विधवा, परितक्त्या महिलांना शिलाई मशीनचे वितरण  · जिल्हा कोषागार कार्यालयाच्या ‘जिजाऊ’ सभागृहाचे उद्घाटन

शिवाजी विद्यापीठा’चे ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ नामांतराची हिंदु जनजागृतीची आंदोलनाद्वारे मागणी !

vishwatmaklokswamivarta

जिल्‍हाधिकारी कार्यालयात सेवा हक्‍क दिन साजरा ; सर्व ऑनलाईन सुविधा केंद्रे कार्यान्वित करण्‍याचे निर्देश उत्‍कृष्‍ट सेवा बजावणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव

विद्युत रोषणाई आपणास १८ ते २३ ऑक्टोबर, २०२५ पर्यंत सायंकाळी ६:३० ते मध्यरात्री १२ पर्यंत पाहता येईल.

vishwatmaklokswamivarta