vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जालना शहरात श्रीराम मंदिरात महाआरती भव्यतेने संपन्न श्री राममंदिराचा क्षण हा इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल – भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

जालना शहरात श्रीराम मंदिरात महाआरती भव्यतेने संपन्न श्री राममंदिराचा क्षण हा इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल – भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

 

जालना (प्रतिनिधी) : आयोध्येतील श्रीराम मंदिरावर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केशरी धर्मध्वज फडकाविण्याचा ऐतिहासिक क्षण साजरा करण्यासाठी जालना शहरातील राम मंदिर, बडी सडक येथे भव्य महाआरतीचे आयोजन आज २५ नोव्हेंबर २०२५ रोजी करण्यात आले होते. कार्यक्रमाला रामभक्त, नागरिक, तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. संपूर्ण वातावरण जय श्रीराम च्या घोषणांनी दुमदुमले होते. यावेळी भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या प्रसंगी जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे म्हणाले की, “श्रीराम मंदिरावर केशरी धर्मध्वज फडकवला जाण्याचा दिवस हा हिंदू समाजाच्या इतिहासातील सुवर्णक्षण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रामराज्याच्या मूल्यांना बळ मिळत आहे. जालना शहरातील रामभक्तांनी आज दाखवलेला भक्तीभाव आणि ऐक्य पाहून मन आनंदित झाले. आगामी काळातही धर्मकार्य, समाजकार्य आणि राष्ट्रकार्य यासाठी आपण सर्वजण एकत्रितपणे काम करत राहू तसेच देशाच्या सांस्कृतिक वारशाला जागतिक पातळीवर मान मिळवून देण्याचे कार्य मोदीजी पूर्ण निष्ठेने करत आहेत हे आजच्या दिवशी पुन्हा अधोरेखित झाले, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन सोमेश काबलिये यांनी केले असून, त्यांच्या प्रयत्नांमुळे महाआरती यशस्वीपणे पार पडली.

यावेळी प्रदेश निमंत्रित सदस्य विमल आगलावे, जिल्हा उपाध्यक्ष सिद्धिविनायक मुळे, धनराज काबलिये, मंडळ अध्यक्ष सुनील खरे, जालना तालुकाध्यक्ष संजय डोंगरे, अर्जुन गेही, नगरसेवक जिवन सले, विजय पवार, सुनील राठीद, अजय भरतीया, संगीता पांजगे, देविदास देशमुख, कपिल दहेकर, जिल्हा सरचिटणीस सुनील पवार, ममता कोंड्याल, स्नेहा जोशी, वर्षा ठाकूर, राजू गवई, कृष्णा गायके, डोंगरसिंग साबळे, कल्याण भदनेकर, रोहित नलावडे, शिवाजी राठोड आदींसह मोठ्या संख्येने रामभक्त, नागरिक, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची अधिकृत घोषणा मुंबईचा महापौर हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेनेचा असेल आणि तो निर्विवादपणे मराठीच असणार ..!

vishwatmaklokswamivarta

एक हात मदतीचा’, गुरुवार  पासून शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मिळणार मदत..

vishwatmaklokswamivarta

राज्यातील उद्योजकता आणि निर्यातीला चालना देण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने आयोजित ‘महा निर्यात-इग्नाइट महाराष्ट्र कन्व्हेन्शन २०२६’ चा ठाणे जिल्हास्तरीय मेळावा संपन्न

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षा अर्जास मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

तासिका तत्वावर सहाय्यक शिक्षक पदासाठी-पात्र व इच्छूक उमेदवारांनी अर्ज सादर करावेत

शेतीवर आधारित उपप्रकल्प करावेत*-माविम व्यवस्थापकीय संचालक राजलक्ष्मी शाह मुंबई*