vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची दिव्यांग व अनाथ मुलांच्या काष्ठ कलाकृती प्रदर्शनाला भेट

राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची दिव्यांग व अनाथ मुलांच्या काष्ठ कलाकृती प्रदर्शनाला भेट

मुंबई, प्रतिनिधी: मतिमंद व अनाथ मुलांचे पालक शंकरबाबा पापळकर यांनी मुंबईत आयोजित केलेल्या काष्ठशिल्प कलाकृतींच्या प्रदर्शनाला राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी भेट दिली व दिव्यांग कलाकारांनी तयार केलेल्या कलाकृतींचे अवलोकन केले.

यावेळी राज्यपालांनी काष्ठशिल्प कलाकारांशी संवाद साधला तसेच शंकरबाबा पापळकर यांच्या कार्याचे कौतुक केले. शंकरबाबा पापळकर यांनी यावेळी राज्यपालांना विविध काष्ठशिल्पांच्या वैशिष्ट्यांची माहिती दिली.  शंकरबाबा पापळकर तसेच पु ल देशपांडे अकादमीच्या संचालिका मीनल जोगळेकर यांनी राज्यपालांचे स्वागत केले.

पद्मश्री शंकर बाबा पापळकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्व. अंबादास पंत वैद्य बेवारस दिव्यांग बालगृह, वझ्झर, जिल्हा अमरावती येथील अनाथ मुलांनी सागवान व बेल आदी लाकडापासून विविध काष्ठशिल्पे साकारली असून या कलाकृती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहे.

यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, कलादालनाच्या क्युरेटर वर्षा कारळे तसेच छायाचित्रकार शिरीष कारळे उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

आताची मोठी बातमी :- काही वेळापूर्वी जम्मूवरील पाकचा मोठा हल्ला भारतीय लष्करानं हाणून पाडला! ♦️ड्रोन आणि ८ क्षेपणास्त्रांचा प्रयत्न अखनूर, सांबा परिसरात फसला. ब्लॅकआउटच्या पार्श्वभूमीवर भारताचं तडाखेबंद प्रत्युत्तर. 

वारसा जतनाची प्रेरणा श्रीक्षेत्र मार्कंडातून…जागतिक वारसा दिनानिमित्त उपक्रम

महारेराच्या प्रलंबित वसुलीसाठी कालबद्ध कार्यक्रम राबवून प्रभावी अंमलबजावणी करा – मंत्री शंभूराज देसाई

वंदे भारत एक्सप्रेसचे उत्साहात स्वागत…

महिला आयोग आपल्या दारी’ ६ नोव्हेंबरला गडचिरोली जिल्हयात**महिलांनी पुढाकार घेत आपल्या तक्रारी मांडाव्या रुपाली चाकणकर यांचे आवाहन**दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांकडून यंत्रणेचा आढावा

vishwatmaklokswamivarta

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडीवर ठोस उपाययोजना करा – आमदार विलास तरे